शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! ‘एफसीआरए’मुळे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले परदेशी निधी स्वीकारणारे राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:12 IST

परदेशातून आलेल्या निधीचा उपयोगही गरजू रुग्णांसाठी करता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला नुकतेच केंद्र सरकारकडून परदेशी देणगी नियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए) परवानगी मिळाली असून, परदेशी निधी स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०२५ मध्ये केंद्राकडे यासंदर्भात मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही परवानगी मिळाली आहे.

या मान्यतेमुळे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबरोबरच आता परदेशातून आलेल्या निधीचा उपयोगही गरजू रुग्णांसाठी करता येणार आहे. त्यातून बोन मॅरो ट्रान्सप्लांट, यकृत प्रत्यारोपण, न्यूरो सर्जरी, कर्करोग उपचार यासारख्या महागड्या उपचारांसाठी वेळेत व पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

एफसीआरए प्रमाणपत्राचे फायदेपरदेशी संस्था आणि परदेशात राहणाऱ्या नागरिकांकडून थेट मदत, डब्लूएचओसारख्या संस्थांकडून थेट देणगी घेता येईल, परदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांकडून आता सरकारी खात्यात अधिकृतपणे निधी जमा करता येईल.अधिक निधी, अधिक रुग्णांना वेळेत मदतएफसीआरए निधीचा उपयोग करून महागडे उपचार शक्य होतील. अपघात, नवजात बालके, तातडीच्या शस्त्रक्रिया अशा गंभीर प्रकरणात तत्काळ निधी पुरवठा करता येईलअनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सीएसआर अंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी निधी देतात. एफसीआरए प्रमाणपत्रामुळे महाराष्ट्र सरकार त्यांच्याशी थेट करार करू शकते.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एफसीआरए प्रमाणपत्र मिळवणारा भारतातील पहिला आणि एकमेव कक्ष ठरला आहे. त्यातून केवळ आर्थिक पाठबळच नव्हे, तर आरोग्य सेवा प्रणालीतील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि सामाजिक सहभाग वाढवणारा संदेश सामाजात गेला आहे.-रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार