औरंगाबाद : डान्सबार बंदीबाबत राज्य सरकार कमी पडले, असा आरोप करत डान्सबार बंदीसाठी प्रसंगी पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी शनिवारी येथे एका कार्यक्रमात दिला. आर.आर. पाटील फाऊंडेशनच्या वतीने देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘डान्सबार बंदी’ विषयावर स्मिता पाटील यांचा संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आ. सतीश चव्हाण होते. स्मिता पाटील म्हणाल्या, डान्सबार बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडण्यास सरकार कमी पडले. का कमी पडले ते माहीत नाही. मात्र, आता सरकारने अधिसूचना काढून कायदेशीर मार्गाने डान्सबारवर बंदी घालावी. सरकार हा निर्णय घेण्यास कमी पडले तर आमच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांसह रस्त्यावर उतरू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)तळतळाट कोण घेणार?स्मिता म्हणाल्या की, माझे वडील गेल्यानंतर बारबाला संघटनेचे काम करणाऱ्या वर्षा काळे यांनी बारबालांचा तळतळाट लागला अशी वृत्तवाहिन्यांच्या चर्चेत टीका केली. मात्र, डान्सबारमुळे ज्या महिलांचे संसार उघड्यावर आले. ज्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली, त्यांचा तळतळाट कोण घेणार? आर. आर. पाटील हे राजकारणात राहिले तरी त्यांनी समाजकारणाचीच भूमिका ठेवली, असेही पाटील यांनी सांगितले.
डान्सबार बंदीसाठी रस्त्यावर उतरू!
By admin | Updated: December 6, 2015 02:36 IST