शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

डोंबिवलीत प्रदूषणाचा ‘रंग’

By admin | Updated: September 20, 2016 03:56 IST

पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात निकषांच्या आधारे प्रक्रिया होत नसल्याने ८६ रासायनिक कारखाने बंद करण्यात आले आहेत.

डोंबिवली : कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात निकषांच्या आधारे प्रक्रिया होत नसल्याने ८६ रासायनिक कारखाने बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही रामचंद्र नाल्यात सोमवारी रसायनमिश्रित लाल रंगाचे पाणी वाहताना दिसून आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास झाला.रामचंद्रनगरातील रहिवासी गिरिजा मराठे म्हणाल्या की, ‘नाल्यातून मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे पाणी वाहत आहे. हे पाणी रासायनिक कारखान्यातून सोडण्यात आले आहे. ते सांडपाणी नसून रसायनमिश्रित सांडपाणी आहे. त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना झाला आहे. माझ्याही घशाला त्रास झाला आहे. अशाच प्रकारचा त्रास २८ आॅगस्टलाही या परिसरातील नागरिकांना झाला होता. या वेळी नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही.’ राष्ट्रीय हरित लवादाने दणका दिल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने डोंबिवलीतील ८६ रासायनिक कारखाने बंद करण्याची नोटीस २ जुलैला दिली आहे. कारखानाबंदीवरील नोटिसांना लवादाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे कारखाने बंद आहेत. कारखानदारांच्या याचिकेवर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी आहे. कारखाने बंद असताना नाल्यात लाल रंगाचे रसायनमिश्रित पाणी कसे काय आले. याचाच अर्थ कारखान्यांतून छुपे उत्पादन सुरू आहे. (प्रतिनिधी)>वाहिनी फुटलीनागरिकांच्या २८ तारखेच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसीला नोटीस बजावून कारखान्यांचे सांडपाणी सोडण्याचे चेंबर सिमेंट लावून बुजवण्याचे आदेश दिले आहेत. ती कार्यवाही सुरू होती. इतक्या कठोर कारवाईनंतर पुन्हा प्रदूषित पाणी नाल्यातून कसे वाहते, असा प्रश्न आहे. दरम्यान, टेम्पोनाका येथे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले.