शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोलमाफिया शागीरचा अखेर मृत्यू

By admin | Updated: December 9, 2014 01:00 IST

कारमध्ये मागे बसलेल्याने गोळी झाडल्यामुळे गंभीर जखमी झालेला शागीर अहमद सिद्दीकी (वय २८) याचा अखेर वोक्हार्टमध्ये मृत्यू झाला. दोन कोटींची सुपारी घेऊन त्याचा सिनेस्टाईल गेम करण्यात

‘सुपारी’ने केला गेम : खुनाचा गुन्हा दाखल नागपूर : कारमध्ये मागे बसलेल्याने गोळी झाडल्यामुळे गंभीर जखमी झालेला शागीर अहमद सिद्दीकी (वय २८) याचा अखेर वोक्हार्टमध्ये मृत्यू झाला. दोन कोटींची सुपारी घेऊन त्याचा सिनेस्टाईल गेम करण्यात आल्याची सर्वत्र चर्चा आहे. गोळी झाडणारे आरोपी हाताशी असताना गेल्या सहा दिवसात पोलिसांनी ‘सुपारी किलिंग’चे हे गंभीर प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, ती पद्धत सीताबर्डी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे की तपासाच्या नावाखाली जाणीवपूर्वक टाईमपास करीत आहे, असाही प्रश्न त्यामुळेच चर्चेला आला आहे. मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसचा रहिवासी असलेला शागीर कोळशाच्या काळ्या व्यवहारातून महिन्याला दीड ते दोन कोटींची खंडणी वसूल करीत होता. महिनाभरापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून तसेच काही गुंडांनी त्याची सुपारी घेतल्याचे कळाल्यापासून शागीर नागपुरात राहायला आला होता. त्याने येथील काही प्रमुख गुन्हेगारांशी संधान साधले होते आणि यातीलच काहींना तो दिवस-रात्र बॉडीगार्ड म्हणून सोबत ठेवत होता. २ डिसेंबरला दुपारी १.२० ते १.२५ च्या सुमारास शागीर आपल्या आॅडी कारमधून (एमएच ४०/ एसी ९७९७) जाकीर खान, शक्ती मनपिया आणि आशिष पारोचे या तिघांसोबत ‘गोकुल’मध्ये आला होता. तेथून नाश्ता घेतल्यानंतर परत जात असताना धरमपेठेतील सुदामा टॉकीजच्या मागे अ‍ॅड. साहिल भांगडे यांच्या कार्यालयासमोर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या शक्तीने ड्रायव्हिंग सीटच्या हेडसपोर्टरच्या मागून शागीरवर पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे शागीर गंभीर जखमी झाला. आरोपींनी नंतर त्याला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले.पोलिसच संशयाच्या घेऱ्यातघटनेच्या तासाभरानंतरच सीताबर्डी पोलिसांनी आरोपी जाकीर, शक्ती आणि आशिषला अटक केली. पीसीआर मिळाल्यामुळे पोलिसांच्या ताब्यात सहा दिवसांपासून आरोपी आहेत. मात्र, या सहा दिवसात पोलिसांनी आरोपींपासून काय वदवून घेतले, याच प्रश्नांचा तपास करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात सीताबर्डीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करून अधिकारी वेळोवेळी विसंगत माहिती देतात. शागीरची हत्या सुपारी घेऊन करण्यात आल्याचे पोलीस सांगतात. मात्र, सुपारी कुणी दिली आणि कुणी घेतली, ते सांगायला तयार नाहीत. सुपारी किती रुपयांची आहे (गुन्हेगारी वर्तुळात दोन कोटींपासून १० कोटींपर्यंतची चर्चा आहे) त्याची माहिती मिळाली नसल्याचे पोलीस म्हणतात. ज्याच्या भरवशावर शक्ती, जाकीर आणि आशिष गेल्या अनेक दिवसांपासून ऐषोआराम भोगत आहेत, त्या शागीरचा गेम त्यांनी कुणाच्या इशाऱ्यावरून केला, ते स्पष्ट झालेले नाही. सीडीआर काढत आहो, नातेवाईकांकडे विचारपूस सुरू आहे, अशी जुजबी माहिती पोलीस सांगत आहेत. काय मिळवले पोलिसांनी?‘पॉवरफूल गुन्हेगाराने’ ही सुपारी घेतली अन् सीताबर्डीच्या एकाशी तो संपर्कात असल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. ती ध्यानात घेता पोलिसांनी गेल्या सहा दिवसात तपासाच्या नावाखाली केलेला ‘टाईमपास’ सीताबर्डी पोलिसांवर संशय निर्माण करणारा आहे. (प्रतिनिधी)