शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी  ‘इम्पिरिकल डाटा’साठी कलेक्टरांमार्फत सर्वेक्षण, राज्य मागासवर्ग आयोगाच्या १४ जुलैच्या बैठकीत हाेणार शिक्कामाेर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 09:36 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने २९ जून २०२१ ला अध्यादेश काढून राज्य मागासवर्ग आयोगाला समर्पित आयोग म्हणून घोषित केले आहे.

कमलेश वानखेडे - 

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने कोरोना स्थितीचा हवाला देत जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक शुक्रवारी स्थगित केली. या संधीचे सोनं करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने हालचाली वाढविल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओबीसींचा ‘इम्पिरिकल डाटा’ गोळा करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. आयोगाच्या १४ जुलैच्या बैठकीत यावर  शिक्कामाेर्तब होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने २९ जून २०२१ ला अध्यादेश काढून राज्य मागासवर्ग आयोगाला समर्पित आयोग म्हणून घोषित केले आहे. आयोगाला सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचा ‘इम्पिरिकल डाटा’ सादर करायचा आहे. त्यासाठी आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. या आयोगाची एक बैठक २ जुलै रोजी पुण्यात झाली. राज्य सरकारकडे ओबीसींची स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पुढील  तीन ते चार महिन्यात अनुभवजन्य माहिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आधार घेतला जाणार आहे. 

३ ते ४ महिन्यात पूर्ण करणार हे सर्वेक्षण करून प्रत्येक जिल्ह्यातील ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगर परिषद, महापालिकेत असलेली सदस्यांची एकूण संख्या, सध्यस्थितीत तेथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा यांच्या माहितीसह स्थानिक पातळीवर असलेली ओबीसींच्या लोकसंख्येच्या टक्केवारीची अनुभवजन्य माहिती मागविली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.  

    असा असेल फाॅर्म्युला-  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेल्या एकूण जागेच्या ५० टक्के जागा आरक्षित म्हणून नोंद केल्या जातील. -  यातून एससी, एसटी या प्रवर्गा साठी आरक्षित असलेल्या जागा वगळल्या जातील. -  उर्वरित जागा ओबीसीच्या जागा म्हणून निश्चित होतील.

    उदाहरणार्थ -  नागपूर जि. प. च्या एकूण ५८ जागांच्या ५०% २९ होतात. -  लोकसंख्येनुसार एससी संंवर्गाला १० जागा व एसटीला ७ जागा राखीव आहेत. अशा एकूण १७ होतात. -  २९ जागांमधून मधून या १७ वगळल्या तर ओबीसीला १२ जागा मिळतील, असा कयास आहे. -  इतरत्र स्थानिक लोकसंख्येनुसार ओबीसीच्या जागा कमी जास्त होतील. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीcollectorजिल्हाधिकारीMaharashtraमहाराष्ट्र