शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंतांची कुचंबणा! राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या २० पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 21:28 IST

उस्मानाबाद : ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कुचंबणा होत असून, अपमानास्पद पद्धतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा ...

उस्मानाबाद : ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कुचंबणा होत असून, अपमानास्पद पद्धतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा सामूहिक राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. मंजूषा मगर व तालुकाध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी सुरेखा जाधव यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्षा वंदना डोके, कळंब तालुकाध्यक्षा मनीषा साळुंके, प्रीती गायकवाड, अफसाना पठाण, ज्योती माळाळे, ऋतुजा भिसे, स्वाती भातलवंडे, बालाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. जिल्हाध्यक्षा ॲड. मगर-माडजे म्हणाल्या, ‘जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आम्ही सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेससोबत निष्ठेने उभा राहिल्या आहोत, असे असताना राज्यपातळीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जागी इतर महिलांची नियुक्ती केली जात आहे.

किमान विश्वासात घेणे किंवा कल्पना देऊन नवीन नेमणूक केल्यास काही वाटले नसते. परंतु कोणतीही कल्पना न देता अत्यंत अपमानास्पदरीत्या इतरांची नियुक्ती करणे योग्य नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याबाबत जयसिंगराव गायकवाड व सक्षणा सलगर यांना कल्पना दिली आहे,’ असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील २० पदाधिकारी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वैयक्तिक कारणास्तव राजीनामा

मंजुषा मगर यांनी वैयक्तिक कारणासाठी स्वत:हून राजीनामा दिला आहे, याची प्रतही आमच्याकडे आहे. तसेच, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसRupali Chakankarरुपाली चाकणकर