शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचे कमबॅक; तापमान ४ अंशांनी घटले; दहा दिवस गारठा टिकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 06:40 IST

'फेंगल' चक्रीवादळाने अडवले होते गार वारे

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. थंडी आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. 

गेल्या काही दिवसांत 'फेंगल' चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील थंडी चांगलीच वाढवली होती; पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी गायब झाली; पण आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंझावात) वारे व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. 

पुण्यात थंडी वाढली ! गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील किमान तापमान हे २० अंशांच्या जवळपास होते. त्यामुळे उष्णता जाणवत होती. अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशांवर नोंदवले गेले. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होईल. रविवारपासून खान्देश, नाशिकपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार, दि.१८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लासह बहुतेक भागात जोरदार हिमवृष्टी होऊ लागली आहे. 

नाशिककरांना पुन्हा हुडहुडी एकाच दिवसात पारा ४ अंशांनी घसरून १२.५ वर आला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. शनिवारी किमान तापमान १६.६ अंशावर होते. पहाटे धुके पसरलेले दिसून आले. धुळ्याचे तापमान ९.५ अंशांवर गेल्या आठ दिवसांपासून कमी झालेला थंडीचा जोर रविवार अचानक वाढला. धुळ्याच्या शहराच्या तापमानाचा पारा ९.५ अंशांवर आल्याची माहिती कृषी महाविद्यालयातर्फे देण्यात आली. 

नागपुरात पारा हळूहळू घसरतोय फेंगल चक्रीवादळाचे सावट ओसरले असले तरी ढगाळ वातावरण नागपूरसह विदर्भात कायम आहे. ही स्थिती दोन दिवस कायम राहील, तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीही शक्यता आहे.

टॅग्स :Temperatureतापमान