शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:17 IST

अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासाकांनी वर्तविला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या परिसरामध्ये सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा प्रभाव अधिक वाढला आहे. त्यामुळे थंड वारे राज्य आणि मुंबईकडे वाहत असल्याने मंगळवारी, बुधवारी मुंबईचे किमान तापमान १४ अंश नोंदवण्यात येईल तर राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासाकांनी वर्तविला आहे.

मुंबईसोबत कोकणातील अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल तर राज्यभरामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये एक अंकी तापमान नोंदवले जाईल. उत्तर महाराष्ट्रमध्ये काही शहरांचे किमान तापमान सहा अंश नोंदविले जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि राज्यभरात हवामानामध्ये प्रामुख्याने बदल होतील. त्या बदलांमुळे थंडीमध्ये आणखी भर पडेल.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविला जात आहे. सोमवारीदेखील मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे मुंबईकरांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला आनंद लुटता येत आहे. गुरुवारनंतर मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविली जाईल. आणि किमान तापमान सर्वसाधारण नोंदवले जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी दिली.

  • मुंबई    १६
  • नाशिक    १४
  • धाराशिव    ११
  • परभणी    ११
  • सातारा    १२
  • अहिल्यानगर    १२
  • छ. संभाजीनगर    १५
  • जळगाव    ११
  • महाबळेश्वर     १४
  • मालेगाव    १४
टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीMumbaiमुंबईPuneपुणे