शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेकडील वाऱ्यांमुळे परतली थंडी! राज्यात पुढील तीन दिवस राहणार कडाका खूप जास्त राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 06:44 IST

राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान ११ अंश, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान ११ अंश, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, पुढील तीन दिवस थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

३ जानेवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते, तर ८ वर्षांपूर्वी २०१६ साली जानेवारी महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ होते. त्यानंतर ८ वर्षांनी  हिवाळ्यात जानेवारीत पारा पुन्हा ३६ नोंदविण्यात आला. रात्री थंड वारे वाहत आहेत. दिवसा पूर्वेकडून गरम वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसाचे तापमान अधिक आहे, तर रात्रीचे तापमान कमी आहे.

कुठे आहे थंडी (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

  • पालघर     : १२.९ 
  • मुंबई     : १६.२ 
  • ठाणे     : २१.२
  • रत्नागिरी     : १८.९ 
  • परभणी     : ११ 
  • नाशिक     : १०.१ 
  • अहिल्यानगर     : ७.७ 
  • छ. संभाजीनगर     : ११.६ 
  • डहाणू     : १६.७ 
  • जळगाव     : ९.६ 
  • कोल्हापूर     : १५.३ 
  • महाबळेश्वर     : १३.८ 
  • नांदेड     : ११.२ 
  • नंदुरबार     : १२.८ 
  • धाराशीव     : १२.३

मधल्या काळात हवामानात बदल झाले होते. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, थंडी कमी झाली होती. आता वातावरण निवळले आहे. थंडीच्या कडाक्यामुळे मुंबईचे किमान तापमान १४ अंश नोंदविण्यात आले होते. आता मात्र तसा गारठा नसल्याने पारा १६ आहे.- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

३ जानेवारीपासून पहाटेच्या किमान तापमानात घसरण होत आहे. शनिवारी राज्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीइतके, तर भागपरत्वे बऱ्याच ठिकाणी अर्ध्या डिग्रीपासून ते साडेतीन डिग्रीपर्यंत खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात थंडीत वाढ होत आहे, तर दुपारी ३ चे कमाल तापमान महाराष्ट्रात भागपरत्वे सरासरीपेक्षा एक डिग्रीपासून ७ डिग्रीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवसा ऊबदारपणा तर रात्री थंडी आहे.- माणिकराव खुळे, हवामान अभ्यासक

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी