शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तापमानात घट; गारठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:19 IST

पुणे : विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. 

ठळक मुद्देनाशिक 10.4, पुणे 11.5, परभणी 11.6, यवतमाळ 12विदर्भात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/मुंबई : दिवाळीपर्यंत लांबलेल्या परतीच्या पावसामुळे शेतशिवारात ओल कायम असून वाहत्या नद्यांमुळे यंदा  नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. भल्या सकाळी ग्रामीण भागामध्ये धुके  पडण्यास सुरूवात झाली असून हवेतील गारवाही वाढला आहे. नाशिकला रविवारी पारा १0.४ अंशांपर्यंत घसरला.नाशिकला सर्वात कमी १0.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.  गेल्यावर्षी १२ नोव्हेंबरला नाशिकचे किमान तापमान ९.६ अंश होते. पुण्यातही रविवारी सकाळी हंगामातील सर्वात कमी  किमान ११.५ अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईत दोन-तीन दिवसांत किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस  आहे. आठवड्याभरापूर्वी ते २६ अंशाच्या आसपास होते. मुंबईत सकाळी व रात्री हवेत गारवा जाणवत आहे.  १५ व १६ नाव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त  केला आहे. 

- नाशिक जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. पारा सातत्याने घसरत असल्याने ग्रामीण भागात अधिक थंडी  जाणवत आहे. सकाळी-सकाळी कामासाठी निघालेल्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी अशी सज्जता करावी लागत  आहे. 

- मुंबईच्या किमान तापमानातही काही प्रमाणात घट झाली आहे. आता जास्त घट अपेक्षित नाही. राज्याच्या उर्वरीत भागां त किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक  कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

- विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा व मध्य  महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात मोठी घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित  भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. 

- थंडी शेतीला पोषक : ही थंडी शेतीला पोषक आहे. गहू पिकाला हे हवामान चांगले आहे. द्राक्ष, केळी बागायतदारांना  िपकांची काळजी घ्यावी लागणार आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकर्‍यांनी पिकांची निगा राखणे गरजेचे आहे.      

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक