शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा थंडी; दोन दिवसांत किमान तापमान आणखी घसरणार, महाबळेश्वर@१३.५

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 04:45 IST

पुढील दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबई : मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी मंगळवारी किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले असून, पहाटे वाहणारे थंड वारे मुंबईकरांची सकाळ गारेगार करत आहेत. पुढील दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १३.५ अंश सेल्सिअस होते, तर मुंबईचे किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाची नोंद १५ अंशाखाली झाली आहे. समुद्र किनारी वसलेल्या शहरांचे किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस होते. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानातही आणखी घसरण होईल.मुंबापुरीतही वाहू लागले गार वारेमुंबईत २६ जानेवारीनंतर थंडीचे पुनरागमन झाले आहे. २७ जानेवारी रोजी मुंबईच्या उपनगरात ठिकठिकाणी रात्रीच्या सुमारास गार वारे वाहत होते. मंगळवारी पहाटेदेखील वातावरणात गारवा होता. शहराच्या तुलनेत उपनगरात हवामान अधिक थंड असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.असा आहे अंदाज२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहील. २९, ३० जानेवारीला मुंबईसह आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अदांज हवामान खात्याने व्यक्त केला.

टॅग्स :weatherहवामान