शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या दिवसांत नारळ महागला; केरळ महापुराचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 05:25 IST

२० ते ४० रुपयांपर्यंत भाव, श्रावण सुरू असल्याने नारळाला अधिक मागणी

कोल्हापूर : केरळातील महापुरामुळे आवक कमी झाल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर नारळाचे दर भडकले आहेत. घाऊक बाजारात १० ते २० टक्क्यांपर्यंत दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला एका नारळासाठी प्रतिवारीप्रमाणे किमान २० रुपयांपासून ४० रुपये मोजावे लागत आहेत.व्रतकैवल्यांचा महिना असणारा श्रावण सुरू झाल्याने नारळाची मागणी अगोदरच वाढली आहे. त्यातच नारळांचे आगार समजल्या जाणाऱ्या केरळला महापूराचा फटका बसल्याने तिकडून होणारी आवक चांगलीच रोडावली आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. या काळात नारळाला सर्वात जास्त मागणी असते. परंतु आतापासून दर वाढू लागले आहेत.त्यामुळे येत्या काही दिवसांत केरळमधून आवक सुरू झाली तरी दर असेच चढे राहतील, असा व्यापाºयांचा अंदाज आहे.केरळमधून नियमित नवा पाणी, जुना पाणी, बोळ, कंगणार, आदी जातींचे नारळ विक्रीसाठी राज्यात येतात. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्याने बोळ नारळाचा वापर केला जातो. त्यामुळे या नारळाचे दर कायम चढेच असतात. सध्या किरकोळ बाजारातील त्याचे दर आणखी वाढून ४० ते ५० रुपये प्रतिनग असा झाला आहे.मुंबईच्या एपीएमसी बाजारात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून नारळाची सर्वाधिक आवक होते. त्यामुळे केरळमधून आवक रोडावल्याचा परिणाम अजून तरी दिसत नाही. परंतु श्रावणाच्या तोंडावर दर वाढले असून त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे व्यापाºयांनी सांगितले.नारळाचे दर असे (घाऊक बाजार)मोठा जुना पाणी नारळ - शेकडा दर १३५० रुपये (पूर्वी १२५० )लहान जुना पाणी नारळ - शेकडा दर १३००(पूर्वी १४००)कंगणार - शेकडा दर - १५००बोळ (हॉटेल किंग) आकारानुसार -शेकडा दर - २८०० ते ३०००

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर