शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील गिरणी कामगारांची जागा आघाडी सरकारने गिळली, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:54 IST

विधानसभेत फडणवीस अन् जयंत पाटील यांच्यात खडाजंगी

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठीची घरे बांधली जायला हवी होती पण तेव्हाच्या आघाडी सरकारने मिल मालक आणि बिल्डरधार्जिणे निर्णय घेऊन या कामगारांना देशोधडीला तर लावलेच शिवाय कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. या वेळी फडणवीस आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.या मिलच्या जागेपैकी ३० टक्के जागा महापालिकेला, ३० टक्के जागा म्हाडाला तर ३० टक्के जागा गिरणी मालकांना मिळायला हवी होती. तथापि, २००१ मध्ये सरकारने धोरण बदलले आणि रिक्त असलेल्या जागेच्या प्रत्येकी ३० टक्के जागांचे वरीलप्रमाणे वाटप केले जाईल, असा निर्णय घेतला. तोपर्यंत जागाच रिक्त राहिलेली नव्हती आणि ती सगळी मालकांच्या व बिल्डरांच्या घशात जाईल, अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला. कमला मिलची इंचभरही जागा महापालिका वा म्हाडाला मिळाली नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर हा निर्णय बदलला आणि पूर्वीचे सूत्र लागू केले. आता खासगी मिलच्या तर जागा राहिलेल्या नाहीत, पण आमच्या निर्णयाचा फायदा होऊन एनटीसीच्या मिलच्या जागेवर तरी गिरणी कामगारांसाठी घरे बांधता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री असा हल्लाबोल करीत असतानाच जयंत पाटील यांनी कमला मिलच्या दुर्घटनेबद्दल बोला. चार वर्षांत तुम्ही झोपा काढल्या का? जुना विषय उकरून काढू नका, असे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी यावर जयंत पाटील यांच्यावर शाब्दिक प्रतिहल्ला केला. कमला मिलची दुर्घटना हे तुमचे पाप आहे. ते मला आता सांगावेच लागेल. तुमच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराने गिरणी कामगार हद्दपार झाला. आम्ही सगळी चौकशी करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर ‘आम्ही चौकशीला घाबरत नाही,’ असे प्रतिआव्हान पाटील यांनी दिले. ‘सत्य हे सत्यच असते आणि सत्य सांगण्यापासून जयंतराव तुम्ही मला रोखू शकत नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.‘ते’ तर महाराष्टाला ठाऊकच आहेत...तत्पूर्वी म्हाडा, महापालिकेला गिरण्यांच्या जागेत हिस्सा मिळू नये म्हणून गिरणी मालकांनी काय काय केले आणि आयटी पार्कच्या नावाखाली मिळालेल्या एफएसआयचे कसे उल्लंघन केले याकडे भाजपाचे आशिष शेलार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. एफएसआय उल्लंघनाचा घोटाळा ५०० कोटी रुपयांचा असून या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली.२००१ मध्ये गिरणीमालकधार्जिणे धोरण स्वीकारले तेव्हा मुख्यमंत्री अन् नगरविकास मंत्री कोण होते हे सभागृहात सांगा, अशी मागणी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केली. त्यावर, ते सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक असल्याचा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटील