शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दलित समाजाला लक्ष्य करण्यासाठीच कोम्बिंग, कॉंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:40 IST

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सध्या कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. रात्री अपरात्री घरात घुसून तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी अटक करण्याचे काम सध्या पोलीस दलाकडून सुरू आहे. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेले कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सध्या कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. रात्री अपरात्री घरात घुसून तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी अटक करण्याचे काम सध्या पोलीस दलाकडून सुरू आहे. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेले कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.राज्यात आतापर्यंत विविध ठिकाणांहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोप दाखल झालेल्या मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांच्यावर मात्र अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनुवादी विचारधारेच्या सरकारच्या इशाºयावर पोलीस कारवाई करत आहेत अशी भावना दलित समाजात निर्माण झाल्याचे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेल्या या अटकसत्राचा काँग्रेस तीव्र शब्दांत निषेध करीत असून राज्य सरकारने हे कोम्बिंग आॅपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.आंबेडकरांचा विरोधभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोम्बिंग आॅपरेशन बेकायदा असल्याचे म्हटले आहे. कोम्बिंग ही लष्करी कारवाई असते. नागरी भागात अशा प्रकारची कारवाई करता येत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्याची मागणी आंबेडकर यांनी अलीकडेच केली. कोम्बिंग बाबत नियमावली तयार करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले होते.कोरेगाव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- संभाजी राजे यांची मागणीअकोला : कोरेगाव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल, त्यांच्यावर गंभीर कारवाई झाली पाहिजे, त्यांना कोणीही पाठीशी घालू नये अशी प्रतिक्रिया खासदार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थानांतरण कार्यक्रमानंतर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत. बहुजन समाजाने शांत राहून समाजात अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न करावेत. कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने दलित-मराठा यामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होऊ नये, यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरेगाव-भीमाच्या घटनेप्रकरणी संभाजी भिडे-मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला; मात्र अटकेची कारवाई नाही, असे का, असा प्रश्न विचारला असता, याचे उत्तर मी नव्हे पोलीस देतील, असे ते म्हणाले. कोरेगाव-भीमाच्या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांचा जोर वाढला असे वाटत असेल तर ते चौकशीतून समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव