शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा देखरेख करणारी एजन्सी अखेर बरखास्त, कोळशामध्ये लोखंडाचा चुरा मिसळण्याचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 08:26 IST

कोळसा वॉशरीजमधील भ्रष्टाचाराच्या दलदलीची साफसफाई सुरू झाली आहे. महाजेनकोने तपासाचे आदेश दिल्यानंतर, नोडल एजन्सी महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनने कोळशावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेली ऑडिट एजन्सी प्राइमस सॅम प्रा.ला बडतर्फचे आदेश दिले.

- कमल शर्मानागपूर - कोळसा वॉशरीजमधील भ्रष्टाचाराच्या दलदलीची साफसफाई सुरू झाली आहे. महाजेनकोने तपासाचे आदेश दिल्यानंतर, नोडल एजन्सी महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनने कोळशावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेली ऑडिट एजन्सी प्राइमस सॅम प्रा.ला बडतर्फचे आदेश दिले. कोल वॉशरीजद्वारे कोळशामध्ये लोखंडाच्या चुऱ्याची भेसळ केली जात असल्याचे यावरून सिद्ध होते. 

‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित करून कोळसा वॉशरीच्या नावाखाली ‘काळ्या सोन्या’तून कमावल्या जाणाऱ्या काळ्या पैशाचा पर्दाफाश केला. यात  लेखापरीक्षणासाठी गठीत थर्ड पार्टीतही आपलेच लोक असल्यावर प्रकाश टाकत एजन्सींच्या कारभाराकडे लक्ष वेधले.   मालिकेची दखल घेत महाजेनकोने एमएसएमसीला चौकशीचे आदेश दिले. आता एमएसएमसीला मॉनिटरिंग एजन्सी प्राइमसला बरखास्तच्या सूचना दिल्या.  लेखा परीक्षणासाठी गठीत ‘थर्ड पार्टी’ही कोल वॉशरीजच्या कर्त्याधर्त्यांचीच आहे. रिजेक्ट कोळशाच्या नावावर खेळ होत आहे त्याचा पर्दाफाश करण्यास एजन्सीही टाळाटाळ करीत आहे.

 पत्रात गंभीर खुलासे एमएसएमसीने एक्सकीनो कॅपिटल सर्विसेसमार्फत प्राइमसला कोल वॉशरीजच्या देखरेखीचे काम सोपविले होते. एक्सकीनोला दिलेल्या पत्रात  एमएसएमसीचे महाव्यवस्थापक पी.वाय. टेंभरे यांनी नमूद केले की, वारंवार प्राइमसला इशारा देऊनही सुधारणा झाली नाही. वृत्तपत्रातील वृत्तांचा संदर्भ देत,  प्राइमसने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. वॉररूमच्या स्थापनेपासून ते वॉशरीज, खाणी आणि सायडिंगपर्यंत पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात कंपनी अपयशी ठरल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.  दुसरीकडे, महाजेनको सातत्याने उणिवांवर जाब विचारत आहे. याबाबत प्राइमसचे व्यवस्थापनही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. कंपनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात, प्रतिसाद देण्यात आणि कराराच्या अटींचे पालन करण्यातही अयशस्वी ठरली.

अशी आहेत कारणे  कोळशात  निकृष्ट गोष्टींचे मिश्रण नाकारलेला कोळसा चढ्या भावाने विकणे वीज केंद्राला निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा कोळसा वॉशरीजद्वारे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCorruptionभ्रष्टाचार