शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्था निवडणूक; स्थगिती लवकरच उठणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:57 IST

राज्यातील सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, नागरी सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी प्रक्रिया संस्था, खरेदी - विक्री संघ, औद्योगिक सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार

मुंबई : राज्यातील हजारो सहकारी संस्थांच्या निवडणुकीला सध्या असलेली स्थगिती उठविण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. सहकार विभागाच्या अधिकृत सुत्रांनी सांगितले, या संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगिती १ सप्टेंबरपासून उठविली जाईल. यापूर्वी दर तीन महिन्यांनी निवडणुकांना स्थगिती देण्याबाबतचे आदेश सहकार विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढले होते. मात्र, आता स्थिती नियंत्रणात असल्याने या निवडणुकांना आणखी स्थगिती दिली जाणार नाही. त्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, नागरी सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी प्रक्रिया संस्था, खरेदी - विक्री संघ, औद्योगिक सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात सुमारे ६० हजार सहकारी संस्थांची मुदत संपूनही स्थगितीमुळे निवडणुका घेता आलेल्या नाहीत.बँकांचीही निवडणूकजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक स्थगितीनंतरची पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने सोमवारी काढले. त्यामुळे १५ जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे.