पुणे : महापालिका निवडणुकीत सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना मतदार दुताची भूमिका पार पाडावी लागणार आहे. सोसायटीत १०० टक्के मतदान व्हावे यासाठी त्यांना जागृती करावी लागणार आहे. महापालिका व सहकार विभागाने ही मोहीम आखली आहे.आत्तापर्यंत पुणे व पिंपरी चिंचवडमधील साडेतीनशे ते चारशे सोसायट्यांमध्ये सहकार विभाग पोहोचला आहे. त्यामुळे कमी कालावधीत १५ हजार सोसायट्यांपर्यंत पोचण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. महापालिकांनी मतदार जागृतीसाठी प्रत्येक सोसायटीच्या ठिकाणी दर्शनी भागात मोठे फलक झळकविण्याची सूचना करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिवांनी संस्थेच्या बैठकीत नैतिकतेने व निश्चितपणे मतदान करण्याचे आवाहन सभासदांना करावे, असे पत्रकच सहकार विभागाने काढले आहे.(प्रतिनिधी)
मतदान वाढीसाठी सहकार विभागाचा पुढाकार!
By admin | Updated: February 5, 2017 01:21 IST