शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्मिला जाहीरनामा समितीच्या सहअध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 01:17 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसने विविध समित्यांची घोषणा केली

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसने विविध समित्यांची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेली बॉलीवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरकडे जाहीरनामा समितीचे सहअध्यक्षपद देण्यात आले आहे.मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी या समित्यांची घोषणा केली. २५ जणांच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्याकडे सोपविण्यात आले असून सहअध्यक्ष म्हणून ऊर्मिला मातोंडकर काम पाहणार आहे. अध्यक्ष मिलिंद देवरा आणि कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची विशेष बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जाहीरमाना समिती, मीडिया-सोशल मीडिया आणि प्रसिद्धी समिती बरोबरच राजशिष्टाचार समितीची स्थापन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. मुणगेकर आणि मातोंडकर यांच्यासह जाहीरनामा समितीत महापालिकेतील गटनेते रवी राजा, भास्कर शेट्टी, वीरेंद्र बक्षी, उमाशंकर ओझा, सुरेश कोपकर यांचा समावेश आहे. तर प्रसिद्धीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद चरण सिंग सप्रा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या समितीत एकूण १३ जणांची निवड करण्यात आली असून संदेश कोंडविलकर यांच्यासह आनंद शुक्ला, झाकीर अहमद या सदस्यांचा समावेश आहे. तर पाच जणांची राजशिष्टाचार समितीची घोषणाही या वेळी करण्यात आली आहे. ज्यात जावेद श्रॉफ, प्रवीण नाईक, शीवजी सिंग यांच्यासह इतर दोघा जणांची या समितीत निवड करण्यात आली आहे.समित्यांमधून संजय निरुपम आणि त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. निरुपम यांच्या अध्यक्षपदाच्या काळात दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत समर्थकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप झाला होता.

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरcongressकाँग्रेस