शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

क्रीमिलेयअरची मर्यादा सहा लाख करणार

By admin | Updated: July 21, 2016 04:36 IST

ओबीसींच्या क्रीमिलेअरची मर्यादा साडेचार लाखावरुन ६ लाख करण्यात येईल व त्याबाबतचा निर्णय अधिवेशन संपण्याच्या आतच घेतला जाईल

मुंबई : ओबीसींच्या क्रीमिलेअरची मर्यादा साडेचार लाखावरुन ६ लाख करण्यात येईल व त्याबाबतचा निर्णय अधिवेशन संपण्याच्या आतच घेतला जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिले.अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय आदींच्या शिष्यवृत्तीसंबंधीच्या लक्षवेधीवर चर्चा सुरु होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला. तोच धागा पकडून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बडोले यांची चांगलीच अडचण केली. सध्या शाळा, कॉलेजांच्या प्रवेशांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे क्रीमिलेयरची मर्यादा साडेचार लाखावरुन ६ लाख किती दिवसात करणार? याचे नेमके उत्तर द्या, तसेच विद्यार्थ्यांच्या फीची प्रतिपूर्ती झाली नाही, तर पुढच्या वर्षात त्यांना प्रवेश देण्यासाठी संस्थाचालक अडचणी निर्माण करतात. पहिली फी भरली नाही तर पुढच्या वर्षीचे प्रवेश देत नाहीत, यावर काय करणार? असा सवाल खडसे यांनी केला. खडसेंच्या या प्रश्नाने सत्ताधारी बाकावर शांतता पसरली, पण विरोधी बाकांवरुन जोरदार स्वागत झाले.प्रश्नाच्या सरबतीमुळे भांबावलेल्या मंत्र्यांनी महिन्याभरात निर्णय घेऊ, असे उत्तर देण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत प्रवेश प्रक्रीया संपून जाईल, असे पुन्हा खडसे म्हणाले. शेवटी मत्रिमंडळापुढे हा विषय नेण्यात येईल आणि अधिवेशन संपण्याच्या आत या विषयावर निर्णय घेतला जाईल, असे उत्तर बडोले यांनी दिले. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती झालेली नाही ; त्यांना प्रवेशात अडचणी निर्माण करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)>असे झाले वाटपराज्यात २०१५-१६ या वर्षात १६,८३,७८४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्तीसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैेकी जुलै २०१६ मध्ये १३,४९,४५५ विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य झाले असून १२,१९९ अर्ज नाकारले असून ३,२२,१३० अर्ज प्रलबित असल्याचे बडोले म्हणाले. यापैकी १,६७,७२४ अर्ज महाविद्यालयांच्या पातळीवर आणि १,५४,४०६ अर्ज जिल्हा पातळीवर प्रलंबित आहेत. यासाठी ३०७८.८९ कोटींची तरतूद करण्यात आली असून २५३२.७० कोटी एवढा खर्च आजपर्यंत झाल्याची माहितीही त्यांनी दिली.