शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Maharashtra Budget Session 2021 : ठाकरे सरकारचा 'मनसे' मानस; पळवाट शोधून परप्रांतीयांना नोकऱ्या देणाऱ्यांची लागणार वाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 13:24 IST

CM Uddhav Thackeray govt to bring a bill for 80 pc reservation for locals in jobs :स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात राज्याने आतापर्यंत चार वेळा शासन निर्णय काढला होता. मात्र त्याची प्रभावी, परिणामकारक अमलबजावणी झाली नाही.

ठळक मुद्देपावसाळी अधिवेशनात स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देणारे विधेयक आणले जाईल.जेव्हा स्थानिकांना दिलेल्या नोकऱ्यांची माहिती मागविले जाते तेव्हा उद्योगांकडून थेट नोकरीतील कामगारांची माहिती दिली जाते. कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून इतर राज्यातील कामगार भरतीचेच षड्यंत्र रचले गेले आहे.

>> स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्यांचे विधेयक पावसाळी अधिवेशनात आणणार>> परप्रांतीयांना नोकरी देण्याची पळवाट रोखणार

मुंबई : शिवसेनेच्या धोरणांमुळे उद्योगांना स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले गेले. आजवर त्याबाबत चार शासन निर्णय जारी झाले. मात्र, पूर्णपणे या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देणारे विधेयक आणले जाईल, अशी घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत केली. कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून परप्रांतीयांना नोकरी देण्याची पळवाट या विधेयकात रोखली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केली. 

राज्यातील अनेक उद्योग बंद पडत चालल्यामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर दिले.  स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात राज्याने आतापर्यंत चार वेळा शासन निर्णय काढला होता. मात्र त्याची प्रभावी, परिणामकारक अमलबजावणी झाली नाही. स्थानिकांना रोजगार मिळू शकला नव्हता. त्यामुळे आता यावर राज्य सरकार एक सर्वंकष कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. 

जेव्हा स्थानिकांना दिलेल्या नोकऱ्यांची माहिती मागविले जाते तेव्हा उद्योगांकडून थेट नोकरीतील कामगारांची माहिती दिली जाते. त्यात स्थानिक भूमिपुत्रांचे प्रमाण ८० टक्केहून जास्त असते. परंतु कंत्राटी कामगारांची माहिती दिली जात नाही. कंत्राटी कामगार हे जणू आमची जबाबदारीच नाही, अशी समजूत कंपन्यांची झाली आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून इतर राज्यातील कामगार भरतीचेच षड्यंत्र रचले गेले आहे. त्यामुळे आगामी विधेयकात कंत्राटी कामगारांची माहिती देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्यांचे प्रमाण वाढेल असे, देसाई म्हणाले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटSubhash Desaiसुभाष देसाई