शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सुशांत सिंह, दिशाच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्र्यांचे दोनदा कॉल, म्हणाले...; राणेंचा सनसनाटी दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 23:27 IST

पोलीस चौकशी संपल्यानंतर बाहेर पडलेल्या नारायण राणेंचा खळबळजनक दावा

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली. जवळपास नऊ तास मालाडमधील मालवणी पोलीस ठाण्यात राणे पिता-पुत्रांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल खळबळजनक दावा केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दोनदा कॉल आला होता. दिशा सालियन प्रकरणात एका मंत्र्याची गाडी तिथे होती, असं बोलू नका, असं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर असं का बोलायचं नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर तुम्हाला पण मुलं आहेत, असं मुख्यमंत्री मला म्हणाले, असा सणसणाटी दावा राणेंनी केला.

सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्र्यांचे दोन कॉल आले. त्यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती मी पोलिसांना आज दिली. मात्र त्यांनी याची नोंद करून घेतली नाही, असंही राणेंनी पुढे सांगितलं. दिशा सालियनला न्याय देण्याचा, सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि शेवटपर्यंत करत राहू, असं राणेंनी सांगितलं.

शरद पवारांना प्रत्युत्तरकेंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली होती. पण त्यांनी राजीनामा दिला का, असा सवाल करत ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यावर पवारांच्या विधानावर काय बोलावं तेच कळत नाही, असं राणे म्हणाले. दाऊद आमचा मित्र नाही. तो देशद्रोही आहे. त्यानं देशात बॉम्बस्फोट घडवले. त्यात निष्पाप नागरिक मारले गेले. त्या दाऊदशी तुमच्या पक्षातल्या मलिक यांचे संबंध आहेत. म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागत आहोत, असं राणेंनी म्हटलं. पवार माझाही राजीनामा मागू शकतात. आतापर्यंत आयुष्यभर तेच तर केलंय, असा पलटवारही राणेंनी केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत