शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 00:13 IST

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महायुती सरकारशी संबंधित मुद्यांपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांचा लोकप्रिय कार्यक्रम 'आप की अदालत' मध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महायुती सरकारशी संबंधित मुद्यांपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या शक्यतेवरही भाष्य केले.

देवेद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनिमित्ताने सभागृहात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना महायुतीसोबत येण्याची खुली ऑफर दिली. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी गंमत केल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, बुधवारी एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. याबाबत रजत शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "सर्वातप्रथम मी हे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. आमचे सरकार पुढील पाच वर्षे चालेल. उद्धव ठाकरेंबद्दल सांगायचे झाले तर, मी त्यांना कोणतीही ऑफर दिली नाही. हा एक विनोद होता. परंतु, माझ्या विनोदाची बातमी बनली. सध्या ऑफर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आता आमच्याकडे जागा नाही. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत आमचे २३२ सदस्य आहेत. त्यामुळे शक्य नाही."

उद्धव ठाकरेंची महायुतीशी युती शक्य नाही, मग बंद दाराआड तुमच्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, असा रजत शर्मा यांनी प्रश्न करताच फडणवीस म्हणाले की, "आमच्यात बंद दाराआड चर्चा झाली नाही, आधी हे मी स्पष्ट करतो. उद्धव ठाकरे हे एका शिष्टमंडळासह आले होते, कमी संख्याबळ असूनही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. प्रथम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आले. त्यानंतर त्यांनी इतरांना बोलावून घेतले. आमच्यात १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर ते निघून गेले. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत, पण याचा अर्थ असा नाही की, आपण बाजू बदलू. महायुतीत कोणताही बदल होणार नसून हेच कॉम्बिनेशन पुढेही पाहायला मिळेल", असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे