शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; "२०१९ ला तुम्ही जोडे धुवायला गेला होता की..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:02 IST

हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यावर अन्याय करणार नाही. लोकांच्या हिताचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली. 

पालघर - सर्वसामान्य जोडे पुसणारा हा विश्वासू असतो तुमच्यासारखा विश्वासघातकी नसतो. त्यामुळे मुजोरीपणा करणाऱ्यांना मतपेटीतून जनता नक्की जोडे मारेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

कंत्राटदार नेते बनायला लागले अन्...; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ ला जोडे पुसायला कोण गेले होते? जोडे धुवायला गेले होते की डोक्यावर घ्यायला गेले होते? हे लोकांना माहिती आहे. हा द्वेष, मत्सर आहे. सर्वसामान्य माणसाबाबत राग आहे. चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला सर्वसामान्य माणसं नेतृत्व करायला लागतात तेव्हा अशाप्रकारे पोटदुखी होते. त्यातूनच अशी प्रतिक्रिया येते असं त्यांनी म्हटलं. 

तसेच बारसू इथं रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर भूमिका बदलली त्याचे कारण काय? याचा शोध जनतेने घेतला पाहिजे. ही दुटप्पी भूमिका वारंवार घेतली जाते. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पालाही हीच भूमिका घेतली होती. परंतु समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही केला. त्याला नावही बाळासाहेबांचे दिले. बारसूचा प्रकल्प सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच, कुणावरही अन्याय न करता हा प्रकल्प लोकांच्या हितासाठी केला जाईल. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यावर अन्याय करणार नाही. लोकांच्या हिताचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? महाराष्ट्रातून चांगले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प राज्यात आणले जातायेत. एअरबस, वेदांता हे प्रकल्प राज्यात का आणले नाहीत? रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्य काय हे लोकांना कळाले पाहिजे. ग्रीन रिफायनरी असेल तर मारझोड कशाला करतायेत? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जनतेसमोर जावे. सध्या मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात फिरतायेत आणि तिकडे लोक रस्त्यावर उतरलेत अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्याचसोबत अलीकडेच जोडे बनवणारी कंपनीही तामिळनाडूत गेली. जोडे पुसण्याची लायकी असलेले लोक राज्य करतायेत. महाराष्ट्राचे होणार काय? माझ्या पाठित वार करून सरकार पाडले. त्याचा सूड आणि बदला घेणारच असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला होता.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे