शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांना तंबी; अजित पवारांनी घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 18:07 IST

मी कमी बोलतो, ऐकून घेतो. मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही फिल्डवर काम केलेले आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात म्हटलं.

मुंबई - तुम्ही जे काही बोलताय त्यापेक्षा डबल, तिबल, चौबल बोलू शकतो. मी तुमच्यासोबत काम केलंय. मी जे ऐकतोय, पाहतोय. एखाद्याची मर्यादा असतो. जर मर्यादेच्या पलीकडे गेले तर कुणीही कुणाचा मुलाहिजा ठेऊ शकत नाही. माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे. मला राजकारण करायचं नाही. परंतु आम्हाला कामातून उत्तर द्यायचं आहे. मी जे राजकारण पाहतोय मला हे बोलणं आवश्यक वाटतं असं सांगत विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना तंबी दिली. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षाचं काम सरकारवर टीका करणं असते. सरकार काय चुकत असेल तर विरोधी पक्षांनी बोट दाखवण्याचं काम जरूर केले पाहिजे. वारंवार महाराष्ट्रावर नैसर्गिक संकटं येतात. या संकटात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. टीका करावी पण त्यात राजकारण असू नये. पूरग्रस्त भागात कोण आधी गेले हे महत्त्वाचं नाही. सत्ताधारी आणि विरोधक लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. त्रुटी असतील तर विरोधी पक्षाने निदर्शनास आणाव्यात. टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा विरोधी पक्षांनी सूचना करण्यावर भर दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी कमी बोलतो, ऐकून घेतो. मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही फिल्डवर काम केलेले आहे. मी पूर्वी तुमच्यासोबत होतो. तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा मी संबंधित पूरग्रस्त भागात जाऊन मदत केली आहे. केरळात पूर आला तिथेही मदतीला गेलो. गुवाहाटीत असताना तिथेही पूर आला होता. काहीजणांनी आमच्यावर टीका केली. परंतु तेथील पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम आम्ही केले. प्रत्येक गोष्टीत राजकारण राजकारण करता. सहन करण्याची मर्यादा असते. प्रत्येक माणूस काम करताना काही ना काही राहून गेलेले असते. त्यामुळे ते शोधण्याचं काम मला कुणी करायला लावू नये. मला इशारा द्यायचा नाही. मी मुख्यमंत्री नसून कार्यकर्ता आहे. रात्री ३-४ पर्यंत आम्ही काम करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या जितक्या कमी करता येईल तितकं करायचं आहे. आत्महत्या कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करू शकलो तर त्याचे समाधान मिळाले. सरकारची ही जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी मिळून आत्महत्या कमी होतील त्यासाठी काम करूया असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना केले. अजित पवारांनी घेतली फिरकीराजकारणात काम करताना श्रद्धा सबुरी हा महत्त्वाचा गुण असतो. विरोधी पक्षाचे आरोप सहन करण्यापलीकडचे आहेत. सहन करण्याला मर्यादा असतात. विरोधकांच्या चिठ्ठ्या आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात इशारा देण्याचं काम केलंय का असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा