शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 19:40 IST

Maharashtra News: सरकार एवढ्या वेगाने काम करतेय ते पाहून, जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर उतरुन मोर्चात आले, आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics:महाविकास आघाडीने महामोर्चा काढत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या मोर्चात तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजपने या मोर्चावर टीका केली आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली असून, महाविकास आघाडीच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

तीनही पक्षांनी एवढी मेहनत घेतली. किती बैठका घेतल्या, किती तयारी केली, आणि मोर्चा आपण पाहिलेला आहे, त्याला किती यश मिळाले आहे, ते मला सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या कोकणातील सभेची माहिती घ्यावी. राज्य सरकारचे काम पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केला आहे. 

सत्ता गेल्याने हताश झालेत, तीच-तीच भाषणे पाहिली

सत्ता गेल्याने हे हताश झालेत. आपण तीच-तीच भाषणे पाहिली. आरोप-प्रत्यरोपांची चढाओढ लागलेली आपण पाहिली. खरे म्हणजे जे चार-पाच महिन्यांपासून आम्ही जे काम करतोय ते पाहून त्यांना हताशपणा आणि नैराश्य आलेले आहे. एवढी मोठी तयारी, तीन पक्ष असूनही अन्य लोकांची मदत घ्यावी लागली. मुंबईत भगवा झेंड्यापेक्षा इतर झेंडे जास्त दिसत होते. त्यामुळे शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी रोज प्रवेश करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

आमचे युतीचे सरकार प्रचंड बहुमताने येईल

संजय राऊतांनी हे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही. ते कोसळेल, असा दावा केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार भक्कम आहे. केंद्राचा भक्कम पाठिंबा आहे. मोदी-शाह यांचा भक्कम पाठिंबा आहे. म्हणून आम्ही निर्णय घेत आहोत. नैराश्यापोटी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहे. कुणी त्यावेळी म्हणाले होते की, एक महिन्यात सरकार पडेल. पण पाच महिने झाले. आता फेब्रुवारीचा मुहूर्त काढला आहे. ते मुहुर्तावर मुहूर्त काढत आहेत. एवढेच आहे की, त्यांना त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी, कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. हे सरकार मजबूत आहे. सरकार सर्व कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पुढच्या निवडणुकीत आमचे युतीचे सरकार प्रचंड बहुमताने येईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले?

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लफंगे कोण आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी लफंगेगिरी कोणी केली? बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले? ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवली त्याच्या पाठित कसा खंजीर खुपसला, ही लफंगेगिरीच आहे, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, जी काही सत्ता मिळवण्यासाठी बेईमानी केलेली आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेय. त्यामुळे जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढेच सांगतो, सरकार एवढ्या वेगवान गतीने काम करतेय ते पाहून त्यांनी धास्ती घेतलीय. त्यामुळे जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर आले आणि मोर्चात आले, आनंद आहे, चांगले आहे, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली. जे आपल्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालणारे, सावरकरांना अपमान करणारे हे व्यासपीठावर होते हे महाराष्ट्राचे दुर्देवी आहे, अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे