शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

व्यासपीठावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन केला अन् नंदूरबारला ७ कोटी मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 17:03 IST

चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन फिरवत तात्काळ नंदूरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी रखडलेला निधी वाटप करण्याचे आदेश दिले.

नंदूरबार - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे गतिमान सरकार आहे. कुठल्याही कामासाठी थांबण्याची गरज नाही. तात्काळ निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. त्याचीच प्रचिती नंदूरबारमधील एका कार्यक्रमात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरूनच शासकीय अधिकाऱ्याला थेट फोन करून नंदूरबारला ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकली. 

नंदूरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हजर होते. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरू होते. तेव्हा त्यांनी नूतन इमारतीसाठी राज्य शासनाकडून येणारा ७ कोटी २८ लाखांचा निधी अद्यापही देण्यात आला नाही. तो लवकरात लवकर देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. तसेच विलासराव देशमुखांच्या कारकिर्दीत ३ दिवसांत १ कोटी निधी दिल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. 

चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन फिरवत तात्काळ नंदूरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी रखडलेला निधी वाटप करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर अवघ्या ३ मिनिटांनी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आणि मंचावरूनच ७ कोटी २८ लाखांचा निधी नंदूरबार नगरपालिकेला दिला. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अनेकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. 

मुख्यमंत्र्यांनी वाचला कामाचा पाढाराज्यातील हे भाजपा-शिवसेना सरकार काम करणारं आहे. या सरकारने ७२ मोठे निर्णय घेतले. सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना केली. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. ३ मिनिटांत स्टेजवरून  नगरपालिकेचे ७ कोटी २८ लाख देणारे हे गतिमान सरकार आहे. बंद जल सिंचन प्रकल्पांना चालना दिली यामुळे अनेक हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी ७ कोटी लोकांना १०० रुपयात आनंदाचा शिधा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे