शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"मी बघा कसं पटकन ऐकतो..."; फडणवीसांच्या वाक्यावर CM एकनाथ शिंदे खो-खो हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:07 IST

Eknath Shinde, Devendra Fadnavis: फडणवीसांच्या त्या विधानावर सभागृहातही पिकला हशा

Eknath Shinde laughing, Devendra Fadnavis: महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ९ मार्चला आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री म्हणून प्रथमच देवेंद्र फडणवीसांनी यंदा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर गेले दोन दिवस विधानसभेत चर्चा झाली. अर्थसंकल्पात काही गोष्टींची कमी आहे, ज्या गोष्टींची अपेक्षा होती त्या पूर्ण झालेल्या नाहीत, जुन्या सरकारने दिलेल्या गोष्टीच पुन्हा नव्याने मांडण्यात आल्या आहेत, अनेक योजना पैशाचा विचार न करता जाहीर करण्यात आल्या आहेत, असा विविध प्रकारचा सूर विरोधकांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना लावला. यात शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देत असताना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस एक असे वाक्य बोलले की बाजूला बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील खो-खो हसू लागले. इतकेच नव्हे तर संपूर्ण सभागृहात हशा पिकला.

काय म्हणाले फडणवीस?

"शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही खूपच कमी आहे असे विरोधक म्हणत आहेत. वर्षाला मिळणाऱ्या मदतीचे विरोधकांनी गणित मांडून महिन्याला किती आणि दिवसाला किती असेही हिशेब मांडले आहेत. पण मी साऱ्यांना सांगू इच्छितो की, ज्यावेळी अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे जेव्हा शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे नुकसान होते, तेव्हा त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. त्यावेळी शेतकऱ्याने न खचता पुन्हा उभे राहावे म्हणून तो भिजाई घ्यायला जेव्हा बाजारात जातो त्यावेळी त्याला या ६००० रूपयांच्या मदतीचा उपयोग होईल अशी आमची खात्री आहे. छोट्या गोष्टीनेच सुरूवात करायला हवी. आता जी रक्कम आहे, त्यात भविष्यात कदाचित वाढदेखील करता येईल. सुरुवात महत्त्वाची असते, ती तुम्ही नाही केली. तुमच्या (महाविकास आघाडीच्या) काळात मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे होते, त्यावेळी त्यांनी ही सूचना मांडली होती. पण तुम्ही ती मान्य केली नाहीत. मी बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पटकन ऐकतो..." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या वाक्यावर शेजारीच बसलेले एकनाथ शिंदे अक्षरश: खो-खो हसले. इतकेच नव्हे तर सभागृहातील इतर सदस्यही हसू लागले.

धनंजय मुंडेंच्या शायरीलाही दिलं शायरीतूनच उत्तर

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका करताना शायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं....मज़ा तो तब हैं जब खुशबु आपके किरदार से आये...", असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनीही शायरीतून उत्तर दिलं. "दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं", असं फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी