शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या तारखेवरून टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले; शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 18:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवलं, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

ठाणे :राम मंदिराच्या तारखेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता टोला लगावला आहे. "काही जणांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नही बताएंगे म्हणत टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण अयोध्येत मंदिरही बनले आणि तारीखही ठरली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांचे दात घशात घालून दाखवण्याचे काम मोदी यांनी केले," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० प्रभू श्रीराम भक्त कार्यकर्ते आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आज मार्गस्थ झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, "वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत असून येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून अभूतपूर्व असा क्षण अनुभवण्यासाठी मीरा भाईंदर ते अयोध्या अशी पदयात्रा ४१ दिवसात पूर्ण करून २१ जानेवारी रोजी हे सारे अयोध्येत पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवले असून आधी हर घर मोदी हा नारा आता मन मन मोदी असा बदलला आहे," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

"२२ जानेवारी रोजी आपल्या साऱ्यांना अयोध्येत भेटणार"

"पायी निघालेल्या ३०० रामभक्तांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये याची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, जागोजागी त्यांची जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जमेल तिथे शिवसैनिकांनीही त्यांचे स्वागत करून त्यांना जमेल ते सहकार्य करावं," असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. तसंच २२ जानेवारी रोजी आपल्या साऱ्यांना अयोध्येत नक्की भेटू, असा शब्दही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला.

दरम्यान, यावेळी आमदार प्रताप सरनाईक, विक्रम प्रताप सिंह तसेच शिवसेनेचे मीरा भाईंदर येथील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी