शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: मंत्रिपदाची घाई झालेल्यांना कसं टाळता?; मुख्यमंत्र्यांनी सांगितली गुरुकिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:43 IST

लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची मुलाखत

मुंबई: मुख्यमंत्री म्हणून कधीकधी अभिनय करावा लागतो. राग आलेला नसतानाही चेहऱ्यावर राग दाखवावा लागतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 या सोहळ्यात अभिनेता रितेश देशमख यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. अनेकांना मंत्रीपद हवं असतं, मात्र प्रत्येकाला मंत्रीपद देता येत नाही. मग अशा परिस्थितीला कसं सामोरे जाता, असा प्रश्न रितेशनं मुख्यमंत्र्यांना विचारला. 'अनेकजण मंत्रीपदासाठी माझ्याकडे येतात. प्रत्येक अधिवेशनाच्या आधी खूप आमदार ही मागणी घेऊन येतात. यावर एक युक्ती केली आहे. पुढच्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असं मी येणाऱ्या प्रत्येकाला सांगतो. प्रत्येक अधिवेशनावेळी मी हेच उत्तर देऊन वेळ मारुन नेतो,' असं उत्तर यावर फडणवीस यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर रितेश देशमुखनं प्रतिप्रश्न केला. प्रत्येक अधिवेशनात तुम्ही मंत्रिपदाची आस बाळगून येणाऱ्याला सारखंच उत्तर देता. त्यावर त्यांचं समाधान होतं का, असं रितेशनं विचारलं. त्यावर साडेचार वर्षे तरी हेच उत्तर देऊन काम चाललं आहे. कारण राजकारण आशेवर चालतं आणि आशा कोणीच सोडत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विविध क्षेत्रातील दिग्गजांचा आज लोकमतकडून गौरव करण्यात आला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस