शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

CM फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत; म्हणाले, “निश्चित मागण्या मान्य...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:43 IST

CM Devendra Fadnavis First Reaction On Manoj Jarange Patil Decision: मागण्यांची लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईच्या आंदोलनाची तारीख जाहीर करेन. तेव्हा मुंबई ठप्प होऊ शकते, मुंबईत आंदोलन सुरू केले तर तिथून काही मराठे माघार घेणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

CM Devendra Fadnavis First Reaction On Manoj Jarange Patil Decision: पावणे दोन वर्ष मी सहन केले. मी फडणवीसांना उत्तर मागितले होते, पण त्यांनी काही दिले नाही. ८ मागण्या केल्या त्या पूर्ण करणार की नाही? मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर मी सरकारला सुखी राहू देणार नाही. मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईला येण्याची तारीख घोषित करेन. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सामूहिक उपोषण केले. इतके दिवस बसावे लागेल वाटले नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू असलेले उपोषण स्थगित केले. उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

बीड प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची यादी वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी १०० टक्के गद्दारी करणार नाही. ते आमच्या मागण्या मान्य करतील जर नाही केले तर लवकरच आम्ही मुंबईला येण्याची तारीख जाहीर करू. यावेळी मुंबई जाम होऊ शकते, मराठे माघारी येऊ शकत नाही. आमच्या लेकराला नख लागू देऊ नका. जर पोरं बिथरले तर आमदार, खासदारांना हाणतील, मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर माघारी घेणार नाही, असा इशारा देताना आंदोलनाची पुढील दिशा काय असू शकेल, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सूतोवाच केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे प्रचारसभा, बैठका घेत आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याच्या निर्णयाबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले याचा आनंद आहे. आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत, ते महायुतीच्या सरकारनेच घेतले आहेत. हे सगळे निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणे ही आमची जबाबदारी आहे, आम्ही तो प्रयत्न करत आहोत. कायद्याच्या चौकटीतील ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल, त्या मागण्या आम्ही निश्चित मान्य करू. पण आमचे म्हणणे एवढेच आहे की, भारताचे संविधान आणि कायदा यांच्या चौकटीतील मागण्या असल्या पाहिजेत. त्या असल्या तर योग्य प्रतिसाद सरकारकडून मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देत असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भाजपा आमदार सुरेश धस यांनी त्यांना ज्यूस देऊन हे उपोषण सोडवले. तसेच मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी नव्याने घेतली जाणार असल्याने आता मराठा आंदोलनाची पुढील दिशा नेमकी कशी असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण