शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:47 IST

CM Devendra Fadnavis: मराठी-हिंदीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावरून राज्यपालांनी केलेले विधान चर्चेत आहे.

CM Devendra Fadnavis: पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. तसेच त्रिभाषा सूत्र लागू करण्यावर महायुती सरकार ठाम आहे. यातच मराठी भाषा बोलण्यावरून अनेक भागांमध्ये वाद होताना दिसत आहेत. अमराठी आणि मराठी यावरूनही राजकारण होताना पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मोठी सभाही घेतली. मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदर येथेही वाद झाला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलेले विधान चर्चेत असून, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी मराठी–हिंदी वादावर भूमिका मांडली. महाराष्ट्रात मराठी बोलले नाही तर मार खावा लागेल, हे सद्यस्थितीत मी वर्तमानपत्रात वाचत आहे. अशाच प्रकारचा वाद तामिळनाडूतही झाला होता तेव्हा मी खासदार होतो. रस्त्याने जाताना जमाव बघून रात्री ९ वाजता मी चालकाला गाडी थांबवायला सांगितले. मला बघून जमाव पांगला. मात्र ज्यांना जमावाकडून मारहाण झाली, ते तिथेच होते. झाल्या प्रकाराची माहिती घेतली असता, ती माणसे हिंदीत बोलू लागली. मला हिंदी येत नसल्याने ते काय बोलत आहेत, हे कळत नव्हते. एका माणसाने तमिळ येत नसल्याने त्यांना मारल्याचे सांगितले. त्यांच्याकडे तमिळ बोलण्याचा आग्रह केला जात होता, ते येत नाही म्हणून बाकीचे लोक त्यांना मारत होते. त्यानुसार आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,  राज्यपाल हे संवैधानिक आहेत. राज्यपालांना कोणत्याही राजकीय वादात ओढणे चुकीचे आहे. राज्यपाल बोलतात ते योग्यच बोलतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच पंढरपूर विकास आराखडा तयार केला जाणार आहे. कोणतीही गोष्ट लपून-छपून केली जाणार नाही. यासंदर्भात जे बाधित होणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्याला तेवढ्याच अर्थाने पाहिले पाहिजे. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत, वैरी नाही. माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्या शुभेच्छा होत्या, त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. अन्यथा आपण कुठल्यातरी चुकीच्या संस्कृतीला पुढे नेत आहोत, असे होईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठीhindiहिंदीPoliticsराजकारण