शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्लस्टर - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:56 IST

कृषी तंत्रज्ञान, मृदा व्यवस्थापन, कीड निर्मूलन तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयीच्या समस्या येत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (एआय) सोडवल्या जातील.

मुंबई  - कृषी तंत्रज्ञान, मृदा व्यवस्थापन, कीड निर्मूलन तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयीच्या समस्या येत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (एआय) सोडवल्या जातील. यासाठी महाराष्टÑात ‘एआय’वर आधारित उद्योगांच्या क्लस्टरची निर्मिती केली जाईल. त्यातून २०२५ पर्यंत २३ कोटी रोजगारनिर्मिती होऊ शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनडा दौऱ्यादरम्यान यासंबंधीच्या सामंजस्य करारावेळी तेथील उद्योजकांना दिली.कॅनडा व अमेरिकेच्या दौºयावर असलेले मुख्यमंत्री तेथील विविध क्षेत्रातील उद्योजकांची भेट घेत आहेत. यादरम्यान त्यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने क्यूबेक प्रांतातील ‘इन्स्टिट्युट आॅफ डाटा व्हॅलोरायझेशन’ (आयव्हीएडीओ), क्यूबेक फंड्स नेचर टेक्नॉलॉजिस व नेक्स्ट एआय या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.या दौºयात राज्य सरकारने ‘एआय’ संबंधी करार केला. करारानुसार राज्यातील ५० स्टार्ट अप्सना ‘नेक्स्ट एआय’ ही कंपनी कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी सहकार्य करणार आहे. क्यूबेकच्या उप प्रमुख डॉमनिक अ‍ॅन्ग्लेड यावेळी उपस्थित होत्या.क्यूबेक सिटी येथे कॅनडा-इंडिया बिझनेस काऊन्सिलच्या (सीआयबीसी) बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.भारतात येणारी सर्वाधिक गुंतवणूक महाराष्टÑात येते. महाराष्टÑ भारतासाठी ‘पॉवर हाऊस’ आहे. त्यामुळे कॅनडातील कंपन्यांनीही महाराष्टÑात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.कॅनडातील भारतीय उच्चायुक्त विकास स्वरूप, कॅनडाचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉर्डन रिव्हज् यावेळी उपस्थित होते.या दौºयादरम्यान क्यूबेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारमंत्री क्रिस्टिनसेंट पीअर यांचीही मुख्यमंत्र्यांनीभेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवएस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र