शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यावर पावसाची आघाडी; विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत ढगांचे सावट, सरीही बरसल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 05:40 IST

पारा ७ ते १३ अंशांपर्यंत घसरला, साेमवारी चाैथ्या दिवशी ढग अधिक सक्रिय झाले.  नागपुरात ३ मिमी, तर गाेंदियात १० मिमी पाऊस नाेंदविला गेला. इतर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण होते. 

नागपूर : सातत्याने येत असलेल्या अवकाळीच्या ढगांनी एप्रिल महिन्याचे चटके अन् उष्णता राेखूनच धरली आहे. साेमवारी सकाळपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत पावसाळी ढगांचे सावट पसरले हाेते. थांबून-थांबून सरीही बरसल्या. त्यामुळे दिवसाचा पारा अक्षरश: ७ ते १३ अंशांपर्यंत खाली काेसळला व गारवा पसरला. 

हवामान विभागाने विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक भागांत १९ ते २४ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला हाेता. पहिला दिवस वगळता इतर दिवशी रात्रीच्या सुमारास किरकाेळ पावसाने हजेरी लावली. साेमवारी चाैथ्या दिवशी ढग अधिक सक्रिय झाले.  नागपुरात ३ मिमी, तर गाेंदियात १० मिमी पाऊस नाेंदविला गेला. इतर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण होते. 

पारा कुठे, किती अंशांवर?  ढगांच्या आच्छादनामुळे सूर्याची किरणे राेखून धरली आणि तापमान खाली घसरले. गाेंदियात पारा १३ अंशांनी घसरून २६.८ अंशांवर पाेहोचला. नागपुरातही कमाल तापमान ७.६ अंशांनी घसरत ३३ अंशांवर आले. वर्धा ६.५, अमरावती ८.४ अंश, अकाेला ५.३ अंशाने खाली घसरत अनुक्रमे ३५.५, ३३ व ३६.९ अंशांवर आले. इतर ठिकाणी १ ते ४ अंशांची घट झाली. तापमान घसरल्याने चटके व उष्णता गायब हाेत वातावरण पूर्णपणे थंड झाले आहे. 

२५ पासून जाेर ओसरेलअवकाळी पावसाची ही सक्रियता २४ एप्रिलपर्यंत राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढचे दाेन दिवस विजा व ढगांच्या गर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता आहे.  २५ एप्रिलपासून पावसाचा जाेर ओसरेल पण पुढच्या २८ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे एप्रिलच्या उन्हापासून पूर्ण सुटका मिळण्याची शक्यता आहे. 

साताऱ्यात जोरदार बरसलासातारा : जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले, तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस