शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मालवणात ढगफुटी, ओढे-नद्यांना पूर, वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:25 IST

कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली.

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली. तिथे ३५० मि.मी. पावसाची नोंद झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसून, लोकांचे संसार पाण्याखाली गेले. अनेक झाडेही उन्मळून पडली.ओढे-नद्यांना पूर आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवली येथे डोंगर खचल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यात वीज पडून ८ ठार झाले आहेत. याशिवाय नगर आणि सोलापुरात प्रत्येकी एक जण दगावला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचे पाण्याचे लोट अनेकांच्या घरात घुसले. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील गाबीतवाडा येथे ९ घरांमध्ये पाणी शिरून घरातील भांडी वाहून गेली. कोचरा-निवती येथे घराला पुराच्या पाण्याने वेढल्याने ९ जण अडकले होते. प्रशासनाने स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले.मालवण तालुक्यातील खालची देवली येथील कुलस्वामिनी मंदिरानजीक डोंगर खचला. यात डोंगराची माती देवली मार्गावरील रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. एका भंगार व्यावसायिकांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. यात चार जण जखमी झाले. रायगड व रत्नागिरीमध्ये मात्र तुलनेने कमी पाऊस झाला. देवगड तालुक्यातील हुर्शी गडदेवाडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने पडेल हायस्कूलमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करीत घर गाठावे लागले.>पेण तालुक्यात भोगावती नदीचे पाणी अचानक वाढल्याने गणेश वास्कर, अनिकेत वास्कर व यशवंत अवास्कर हे तिघे वाहून गेले.>कोकण, गोव्यातील गुहागर, पणजी, रत्नागिरी १५०, मार्मागोवा, मोरगाव ११०, कणकवली, मडगाव ९०, खेड ८०, फोंडा ७०, संगमेश्वर, देवरुख, वाल्पोई ६०, चिपळूण ५० मि.मी. पाऊस.मध्य महाराष्ट्रात राधानगरी ५०, अमळनेर, जावळी माथा, खटाव, वडूज, नंदूरबार, ओझर, तळोदा ३०, बारामती, कोल्हापूर २० मि.मी. पाऊस.मराठवाड्यात सेलू ५०, अहमदपूर, आष्टी ४०, मानवत, परळी वैजनाथ ३०, अंबड, भूम, जिंतूर, नायगांव, खैरगांव, पालम २० मि.मी पाऊस पडला़विदर्भात मूर्तिजापूर ९०, अमरावती ७०, बार्शी टाकळी ६०, अकोला ५०, अंजनगाव, चिखलदरा, दिनापूर, कारंजा लाड, मंगरुळपीर, परतवाडा, पुसद, रामटेक ३० मि.मी. पाऊस झाला.>मराठवाड्यात वीज पडून ८ ठारउस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस जोरदार पाऊस झाला. चार ठिकाणी वीज पडून ८ जणांचा मृत्यू झाला. एकट्या नांदेड जिल्ह्यात चौघे दगावले आहेत. लातूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.अहमदनगर जिल्ह्यातील धालवडी (ता. कर्जत) येथील शेतकºयाच्या जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हुलगेवाडी (ता. करमाळा) येथे एक जण ठार झाला. बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव बुद्रूक (ता. खामगाव) येथे वीज पडून झालाखाली उभे राहिलेल्या बाप-लेकीचा मृत्यू झाला.>पुरात युवती वाहून गेलीखान्देशातही जोरदार पाऊस झाला. बोदवड तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात चार बैलगाड्या उलटल्या. त्यात एक १६ वर्षीय युवती वाहून गेली.>मान्सून सक्रिय होणार : हिंदी महासागरव परिसरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून, २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याचा आशादायक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दक्षिण महाराष्ट्र ते केरळ दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात मालवण ३५०, वेंगुर्ला ३२०, राजापूर २६०, मापुसा २२०, देवगड १९० व कुडाळ, पेडणे, सावंतवाडी येथे १७० मिमी पावसाची नोंदी झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस