शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगवासाच्या शिक्षेच्या विरोधात व्यापाऱ्यांनी केली धान्यखरेदी बंद

By यदू जोशी | Updated: August 24, 2018 02:35 IST

‘आधारभूत’पेक्षा कमी दर दिल्यास सजा; अकोला, जालना, बार्शीमधील व्यवहार ठप्प

- यदु जोशीमुंबई : शेतमालाची खरेदी सरकारने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात खरेदी करणाºया व्यापाºयास एक वर्षाची कैद व ५० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाच्या निषेधार्थ शेतमालाची खरेदी बंद करण्याची भूमिका व्यापाºयांनी घेतली आहे. अकोला, जालना, बार्शी येथील बाजार समित्यांमधील व्यवहार गुरूवारी ठप्प होते. शुक्रवारपासून त्याचे लोण अन्य बाजार समित्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आधारभूत किमतीने खरेदी न करणाºया व्यापाºयांना तुरुंगात धाडण्याचा व रोख स्वरुपात दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतमालाची खरेदी मनमानीपणे करण्याच्या व्यापाºयांच्या प्रवृत्तीला चाप बसेल, अशी सरकारची भूमिका आहे.पणन कायद्याच्या कलम २९ मध्ये शेतमालाची खरेदी आधारभूतपेक्षा कमी किमतीने होऊ नये यासाठी पाऊले उचलण्याचे अधिकार बाजार समित्यांना देण्यात आले. कमी दरात खरेदी करणाºया व्यापाºयाचा परवाना रद्द करण्याचे अधिकार बाजार समितीला आधीपासूनच आहेत. मात्र, आता शिक्षेची तरतूद करण्यात आली.आधारभूत किमतीने व्यापाºयांनी ए ग्रेडचा (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) माल खरेदी करावयाचा असतो. त्यापेक्षा कमी दर्जाचा माल आधारभूत किमतीने खरेदी करण्याची व्यापाºयांवर सक्ती नाही. सरकारचा हा निर्णय दुधारी ठरू शकतो. व्यापारी आणि बाजार समित्या यात हेवेदावे असतील तर व्यापाºयांवर आकसाने कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतमालाच्या ग्रेडेशनची सक्षम व्यवस्था बाजार समित्यांना तयार करावी लागणार आहे.हा निर्णय शेतकरी हिताचा आहे. आधारभूत किमत मिळणे हा शेतकºयांचा अधिकार आहे. व्यापाºयांनी भीती बाळगण्याची गरज नाही. या निर्णयाला पूरक अशी पणन व्यवस्था उभी राहिलेली दिसेल, असे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले.शेतकºयांची पिळवणूक होऊ नये म्हणून...शेतकºयांची पिळवणूक होऊ नये म्हणून आणि नियम असूनही आधारभूत किमतीने खरेदी होत नव्हती म्हणून निर्णय घेतला. - सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री.हा निर्णय मागे घ्यावा. कैदेच्या भीतीने व्यापारी खरेदी करणार नाहीत. अशावेळी सरकारने माल खरेदी करायला हवा. सरकारची तशी कुठलीही तयारी नाही.- ललितभाई शहा,सभापती, लातूर बाजार समिती