शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीतील आरक्षणाचा मार्ग मोकळा, की आरक्षणावर शासनाचे गंडांतर?, सामान्य प्रशासन विभागाच्या जीआरमुळे गोंधळात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 05:26 IST

reservation in promotions : सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशामुळे मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द होणार असून, तो आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून आरक्षण देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे म्हटले जात असतानाच गुरुवारच्या आदेशामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर गंडांतर येईल, अशी भीती दुसरीकडे व्यक्त करण्यात आली आहे.या आदेशाचा फायदा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या मागास प्रवर्गामधील कर्मचाऱ्यांना होणार आहे. २००४मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा केला होता. मात्र, त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने पदोन्नती आरक्षण रद्द ठरविले होते. मात्र, त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, प्रकरण प्रलंबित आहे.या प्रलंबित प्रकरणाच्या अधीन राहून पदोन्नतीत ३३ टक्के आरक्षण देण्याची भूमिका आता राज्य सरकारने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २००४चा आरक्षणाचा कायदा वैध ठरवला तर राज्य सरकारने पदोन्नती दिल्यास आरक्षण कायम राहील, असे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी म्हटले आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशामुळे मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द होणार असून, तो आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

...तर ९५ टक्के मागासवर्गीय पदोन्नतीपासून वंचित सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून यापुढे पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व १०० टक्के पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येतील, असे गुरुवारच्या आदेशात म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे २९ डिसेंबरचे पत्र रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना मागासवर्गीयांची आरक्षणाची ३३ टक्के पदोन्नतीची पदेसुद्धा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून भरण्यात येतील, असा निर्णय घेतला. 

टॅग्स :reservationआरक्षण