शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या पोरानं अवघा सोशल मीडिया 'हिला डाला'; परीक्षा रद्द झाली म्हणून चंद्राचे फोटो खेचले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:20 IST

काही लेख आणि यू ट्युबवर पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतली. सोशल मीडियावर व्हायरल

पुणे : ‘ॲस्ट्रोफोटोग्राफी’चा छंद असलेल्या पुण्यातील सोळावर्षीय प्रथमेश जाजू याने चंद्राचे एक सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र टिपले. सोशल मीडियावर त्याने हे छायाचित्र टाकल्यानंतर चंद्राच्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांपैकी हे छायाचित्र असल्याचे सांगत, खगोलप्रेमींकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अल्पावधीतच हे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

प्रभात रस्त्यावर वास्तव्यास असलेला प्रथमेश ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा सदस्य आहे. तो म्हणाला, काही लेख आणि यू ट्युबवर पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतली. मी चंद्राचे एकच छायाचित्र काढू शकलो असतो. पण त्याच्या ५० हजार इमेज काढल्या. जसा आपण मोबाइलमध्ये ‘पॅनोरमा’ काढतो, तसाच मी चंद्राचा पॅनोरमा काढला. चंद्राच्या छोट्या भागाला झूम करून त्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर छोट्या-छोट्या भागांचे व्हिडीओ काढले, त्यातून छायाचित्रं मिळाली. एका व्हिडीओमधून तब्बल २००० छायाचित्रे मिळाली. या माध्यमातून जवळपास ३८ व्हिडीओ काढले. 

मग एक व्हिडीओ घेऊन तो प्रोसेस केला. त्यातून एक छायाचित्र तयार केले. ३८  छायाचित्र काढल्यानंतर मग ती एकमेकांमध्ये मिक्स करत गेलो. सर्व इमेज जोडल्यानंतर एक छायाचित्र तयार केले. भारतात अजून तरी अशा पद्धतीने कुणी छायाचित्र काढले नसल्याचा दावाही त्याने केला. 

ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करण्याची इच्छाखगोलशास्त्राची विशेष आवड असल्याने ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉफिजिक्समध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे प्रथमेशने सांगितले.