शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी, बारावीचे वर्ग पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 02:06 IST

दुपारची वेळ... शहरातील नामांकित महाविद्यालयांना शिक्षण अधिकारी मंगळवारी अचानक भेट देतात... त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होते.

पुणे : दुपारची वेळ... शहरातील नामांकित महाविद्यालयांना शिक्षण अधिकारी मंगळवारी अचानक भेट देतात... त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होते. अकरावी-बारावीच्या वर्गात पाहणी करून झाडाझडती घेतली जाते; मात्र एकूण पटसंख्येच्या एक तृतीयांश विद्यार्थीही वर्गात हजर नसल्याचे पाहून अधिकारी चक्रावून जातात. याबाबत विचारणा केली असता अनेक जन खासगी क्लसेसला प्राधान्य देत असल्याची कबुली विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना दिली.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे राबविलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून शहरातील नामांकित महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, असा अट्टहास विद्यार्थी व पालकांकडून धरला जातो. नामांकित महाविद्यालयातील विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घेऊन पालक हजारो रुपये शुल्क भरतात. विद्यार्थ्यांनी दररोज महाविद्यालयाच्या वेळापत्रका प्रमाणे तासांना येऊन बसणे आवश्यक असते; परंतु बहुतेक विद्यार्थी वर्गाबाहेरच फिरतात किंवा महाविद्यालयाच्या वेळेत खासगी क्लासेसमध्ये जाऊन शिकवणीला प्राधान्य देतात. याचाच आढावा घेण्यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या एका पथकाने मंगळवारी शहरातील महाविद्यालयाच्या झाडाझडतीस सुरुवात केली. पहिल्या दिवशी नौरोसजी वाडिया व नेस वाडिया महाविद्यालयांना भेट दिली. पुढील काही दिवसांत ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. परिणामी शहरातील इतरही महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे चित्र समोर येणार आहे. पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक मीनाक्षी राऊत, आर. जी. जाधव, माजी प्राचार्या सतिंदरजीत कौल आदींनी वाडिया कॉलेजमधील वर्ग व प्रयोगशाळांना प्रत्यक्ष भेट दिली. (प्रतिनिधी)अनुपस्थितीमुळे घटली टक्केवारीअकरावीचे काही विद्यार्थी दररोज वर्गात हजर राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी घटत चालेली असल्याचे वाडिया कॉलेजमध्ये दिसून आले. बारावीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यांला दहावीत ७९ टक्के गुण मिळाले होते. मात्र, त्याच विद्यार्थ्याला अकरावीत ५८टक्के गुण मिळाले. अशीच स्थिती आणखी काही विद्यार्थ्यांची होती. विद्यार्थी दररोज वर्गात हजर राहिले, तर निकालाची टक्केवारी आपोआप वाढेल, त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आल्या.बहुतेक विद्यार्थी केवळ कॉलेजच्या प्रॅक्टिकल्सला उपस्थित राहत आहेत. खासगी क्लासेसचा वेळ आणि महाविद्यालयांचे तास एकाच वेळी असल्याने विद्यार्थी कॉलेजमध्ये गैरहजर राहत आहेत. वाडिया कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी आम्ही खासगी क्लासमध्ये जातो. त्यामुळे कॉलेजमध्ये गैरजहजर राहतो, असे सांगितले. तसेच, एका खेळाडू विद्यार्थिनीने मी खेळाचा सराव करण्यासाठी जात असल्याने वर्गात बसू शकत नसल्याचे सांगितले.नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या अकरावीच्या विज्ञान शाखेच्या वर्गातील काही तुकड्यांमध्ये केवळ ३० ते ३५ विद्यार्थी हजर होते. तर, काही विद्यार्थी वर्गाबाहेर ग्रुप करून गप्पा मारत बसले होते. वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती यात चांगलाच फरक दिसून आला. बहुतेक विद्यार्थी केवळ प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात येत असल्याचे दिसून आले. आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची हजेरी नेहमीच चांगली असते. विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक सिस्टीम बसविण्यात आली आहे. नियमितपणे पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत त्यांना कल्पना दिली जाते. परीक्षांचा कालावधी जवळ असल्याने सध्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे.- डॉ. एम. एम. अंडार, प्राचार्य, नेस वाडिया कॉलेज