दासगाव/ महाड : महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील मुमूर्शाी गावातील काही मंडळी गणपतीच्या ठिकाणाहून नाचून आपल्या घरी परत जात असताना रस्त्यामध्ये दुसऱ्या गावातील मंडळीचे नाच सुरू होते. एकमेकांना टोमणे मारल्याने दोन्ही गटात हाणामारी झाली, यामध्ये दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्याने महाड तालुका पोलीस ठाण्यात १५ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील ममूर्शी गावातील संजय पाटे हे आपल्या मित्रांसह गावातील बाहू चिले यांच्या घरी गणपतीच्या ठिकाणी नाचासाठी गेले होते. नाच आटपून बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरी परतताना रस्त्यामध्ये सूर्यकांत उत्तेकर यांच्याकडे एकमेकांना टोमणे मारल्यावरून बाचाबाची झाली. यामध्ये सूर्यकांत उत्तेकर यांनी काही गावातील मंडळी जमवली व संजय पार्टे व त्यांच्या सोबत असणारी मंडळी तसेच सूर्यकांत उत्तेकर यांनी जमवलेल्या मंडळीमध्ये दगड काठीने हाणामारी झाली. दुसऱ्या फिर्यादीनुसार सुर्यकांत उत्तेकर (रा. मुमूर्शी) व त्यांची मुले गावातील एका गणपतीच्या ठिकाणाहून घरी जात होते. त्यादरम्यान संजय पार्टे हे काही साथीदारासोबत उभे होते. सूर्यकांत उत्तेकर यांच्या दोन्ही मुलांनी कुत्रा कोणाला म्हणालास याचा जाब विचारला असता याचा मनात राग धरून या ठिकाणीही दोन्ही गटामध्ये हातबुक्क्याने तसेच दगड व बांबूने हाणामारी झाली. दोन्ही बाजूच्या फिर्यादीनुसार संजय पार्टे, संतोष निकम, विश्वनाथ चव्हाण, सूर्यकांत पार्टे, देवीदास चव्हाण, शुभम पार्टे, अभिजीत सकपाळ, विनीत पार्टे, आकाश पार्टे, अजय पार्टे, सूर्यकांत उत्तेकर, आत्माराम पार्टे, स्वप्नील उत्तेकर, ओमकार उत्तेकर, विक्रम पार्टे सर्व रा. ममूर्शी राधाकृष्ण वाडी, ता. महाड यांच्यावर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हाणामारीत वर्षा पार्टे, संजय पार्टे, आकाश पार्टे, सुजाता उत्तेकर, अस्मिता पार्टे असे दोन्ही पार्टीमधील ५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)>पाच जण जखमीहाणामारीत वर्षा पार्टे, संजय पार्टे, आकाश पार्टे, सुजाता उत्तेकर, अस्मिता पार्टे असे दोन्ही पार्टीमधील ५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. महाड तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सदाशिव म्हात्रे, पो. उपनिरीक्षक महाड तालुका पोलीस करीत आहेत.
मुमूर्शी गावात दोन गटात हाणामारी
By admin | Updated: September 10, 2016 02:34 IST