शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर बंदी कायदा गैरलागू असल्याचा दावा; शिंदे गटाच्या वकिलांनी केला युक्तिवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 06:21 IST

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे शिंदे गटाकडून मंगळवारपासून युक्तिवाद सुरू झाला. तोच बुधवारी कौल यांनी पुढे नेला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या विरोधात बंड केले नव्हते तर लोकप्रतिनिधींचा विश्वास गमावलेल्या पक्षानेतृत्वासमोर पर्यायी गट उभा केला. याला शिवसेनेतील बहुसंख्य लोकप्रतिनिधींचे समर्थन होते. याला निवडणूक आयोगाने मान्यता देऊन खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असल्याचा निर्वाळा दिलेला असल्याने पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी व राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीच्या तरतुदी गैरलागू असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी बुधवारी केला. 

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे शिंदे गटाकडून मंगळवारपासून युक्तिवाद सुरू झाला. तोच बुधवारी कौल यांनी पुढे नेला. शिवसेनेत फूट पडली नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

यात दखल नकोआमदार अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत. त्यात कोर्टाची दखल योग्य नाही, असे कौल म्हणाले.    - संबंधित बातमी/आतील पान

शिवसेनेत कोणतीही फूट नाहीn शिंदे गटाची निर्मिती ही फुटीरतेतून किंवा बंडातून झालेली नसल्याचा दावा करून कौल म्हणाले, शिवसेनेत फूट पडली, असा आमचा कधीही दावा नव्हता व नाही. n आम्हीच शिवसेना आहोत, हाच दावा पहिल्या दिवसापासून केला. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देऊन निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केल्याचे कौल यांनी घटनापीठाच्या निदर्शनास आणून दिले.n राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीतील तरतुदी फुटीर किंवा बंड केलेल्या गटाला लागू होतात. त्यामुळे १०व्या अनुसूचीतील तरतुदी शिंदे गटाला लागू नाहीत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना