शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मलकापूर शहराचा आधार हरपला !

By admin | Updated: December 2, 2014 21:27 IST

मान्यवरांची प्रतिक्रिया : स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नेते, भाग्यविधाते म्हणून भास्करराव शिंदेंचा नावलौकिक

मलकापूर : शहराचे भाग्यविधाते माजी आमदार स्वातंत्र्य सैनिक भास्करराव ज्ञानोबा शिंदे (वय ८२) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शहराचा आधार हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.मलकापूर येथील शेतकरी कुटुंबात १२ मे १९३२ रोजी भास्करराव शिंदे यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या मॅट्रिकपर्यंत झाले. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत आनंदराव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा प्रेमलाताई चव्हाण यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. समाजकारण व राजकारणातील त्यांची जिद्द व चिकाटी यामुळे त्यांना १९८२ साली विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली. शासनाच्या रोजगार हमी, अंदाज समिती, पंचायत राज यासारख्या महत्वाच्या समित्यांमध्ये त्यांनी काम केले.त्यांचे कार्य पाहून १९८८ ते ९४ या काळात पुन्हा त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. १९७२ मध्ये त्यांनी मलकापूर गावाला स्वतंत्र दर्जा मिळवून घेतला. मलकापूरच्या चोवीस तास नळपाणी पुरवठा योजनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. या योजनेसाठी त्यांचे सातत्याने नगरपंचायतीला सहकार्य लाभले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी सायंकाळी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्यासमवेत चिरंजीव मनोहर शिंदे, सून लता शिंदे, संदीप शिंदे, नातू धनराज शिंदे आदी होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांनी फोनवरून मनोहर शिंदे व कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, जयंत पाटील, भाई पंजाबराव चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, बाजार समितीचे माजी सभापती दाजी पवार, माजी उपसभापती सुनील पाटील, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, विनायक पावसकर, नगरसेवक हणमंत पवार, जयवंतराव पाटील, श्रीकांत मुळे, अर्बन बँकेचे अध्यक्ष सुभाषराव एरम, दिलीप जाधव, अरूण जाधव, सभापती देवराज पाटील, विठ्ठलराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, अश्विनी लवटे, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, फारूख पटवेकर, हिंदुराव पाटील, चिमण डांगे यांच्यासह मान्यवरांनी भास्करराव शिंदे यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)मलकापूरात व्यवहार बंदभास्करराव शिंदे यांचे निधन झाल्याची वार्ता समजताच शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता त्यांचे पार्थीव मलकापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती.