शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Chipi Airport : या विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 1:56 PM

कोकणाला निसर्गाचं वरदान आहे, कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं : अजित पवार

ठळक मुद्देकोकणाला निसर्गाचं वरदान आहे, कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं : अजित पवार

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर सर्वांसाठी खुला होत आहे. या विमानतळाच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), रामदास आठवले सुभाष देसाई  आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) हेदेखील उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त करत या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं म्हटलं.

"या विमातळाचा इतिहास मोठा आहे. एकट्या दुकट्यानं काही होत नाही. कोकणाला निसर्गाचं वरदान आहे. कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. सध्या चिपी विमानतळाचा अडीच किमीचा रन वे आहे. आम्ही येताना पाहत होतो आणि चर्चाही केली. याच्या बाजूला मोकळी जागाही आहे. हा रन वे साडेतीन किमीचा होऊ शकतो," असं पवार यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्याचंही सांगितलं. तसंच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही गडकरींचीही भेट मागितली असल्याची माहिती दिली. 

महामार्गासाठी असणाऱ्या अडचणी आम्ही सोडवणार आहोत. गोव्याला जाणारा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. गडकरींनी महाराष्ट्राला भरीव मदत केली. आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोलून प्रश्न सोडवू आणि आर्थिक जबाबदारीही उचलू असं गडकरी म्हणाले, असल्याचंही पवार यांनी नमूद केलं. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजही मंजुर करण्यात आलं आहे. त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. पर्यंटनाच्या बाबती आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे याचं लक्ष आहे. त्यांनी आणलेले प्रस्तावही विकासाच्या दृष्टीनं आम्बी मंजूर करत असतो. पुढील काळात कोकणातील आर्थिक परिस्थिती अधिक उत्तम व्हावी अशी अपेक्षा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChipi airportचिपी विमानतळ