शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

तुर्कीवरून आलेली चिनी, वेल्वेट, कटवर्क जायनमाज ठरतेय आकर्षण

By appasaheb.patil | Updated: May 20, 2019 15:53 IST

रमजान ईद विशेष : धार्मिक पुस्तकांना मागणी वाढली, कुरआन शरीफ, पंचपारा, ३० पारे कुरआनला मागणी जास्त

ठळक मुद्दे रमजान महिन्यात दहा ते पंधरा हजारांहून अधिक धार्मिक ग्रंथांची विक्री शहरातील विविध ठिकाणी असे २० ते २५ धार्मिक ग्रंथ, पुस्तकांची दुकानेरमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लीम बांधव धार्मिक कार्यक्रमात व्यस्त

आप्पासाहेब पाटील सोलापूर : पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे़ या महिन्यात रोजा (उपवास) करण्याबरोबरच धर्मग्रंथांच्या वाचनाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते़ यावर्षी कुरआन शरीफ, पंचपारा कुरआन शरीफ, तीस पारे कुरआन शरीफ, पंचसुरा, जरुरियाते दिन, यासीन शरीफ, पारा सेट, अल्लाह की वजाह, मसनून दुआँए या धार्मिक पुस्तकांना मागणी अधिक प्रमाणात आहे़ याशिवाय तुर्कीवरून आलेली चिनी, वेल्वेट, कटवर्क जायनमाजही मुस्लीम बांधवांचे आकर्षण ठरत असल्याची माहिती विजापूर वेसमधील पुस्तक विक्रेते मुमताज हुसेन चौधरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

हिंदी, अरबी, इंग्रजी, मराठी कुरआन, कुरआनचे ३० पाºयाचे सेट, हदिस बुखारी शरीफ, तफसीर, तफसीर इब्ने कसीर आदींची विक्री या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होते. कुरआनमधील ३० अध्याय यांचे स्वतंत्र पुस्तक उपलब्ध आहे. कुरआन शरीफची किंमत साधारण: २०० रुपयांपासून १३०० रुपयांपर्यंत तर पारा सेटची किंमत ५०० ते १७०० रुपयांपर्यंत आहे.

कुरआनचा विविध भाषांमधील अनुवादही लोक मोठ्या प्रमाणावर वाचतात. त्याशिवाय प्रार्थनेसंदर्भातील पुस्तकेही उपलब्ध आहेत. डीलक्स स्वरूपाचे कुरआनही बाजारात आले आहे. वाचताना कुरआन ठेवण्यासाठी रिहालही विक्रीस वापरले जाते. 

६५ रुपये ते १२५ रुपयांपर्यंत याची किंमत आहे. हिंदी भाषेतील कुरआन ५५० रुपयांपर्यंत, अरबी भाषेतील कुरआन ५५० रुपयांपर्यंत तर इंग्रजी भाषेतील कुरआन ४०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. 

महिला वर्गाकडून धार्मिक पुस्तकांना मागणी- रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लीम बांधव धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असतात. महिलाही दिवसभर रोजा (उपवास) करून घरात नमाज, कुरआन पठण करतात. त्यामुळे या महिन्यात कुरआनसहित अन्य धार्मिक पुस्तकांना मोठी मागणी असते. या महिन्यात रिकाम्या वेळेत अल्लाहचा जप व्हावा, यासाठी मुस्लीम बांधव खूप परिश्रम घेत असतात़ धार्मिक पुस्तके भेट देण्यासाठी मदरसा, मस्जिदमध्ये वाचण्यासाठीही नेली जातात. लग्नात आपल्या मुलीला कुरआन भेट देण्याचीही प्रथा आहे.

यंदा नमाज कशी पडावी, दुआँ कशी करावी यासह लहान-लहान पुस्तके रमजान महिन्यात विक्रीस आली आहेत़ याशिवाय काबा कुरआन पेटी हे सर्वांचे लक्ष वेधत आहे़ कुरआन आयतों से इलाज, मसनुन दुआँए, हिसनुल मुस्लीम, जरुरियाते दिन, बरकाते रमजान, दुआ की किताब या धार्मिक पुस्तक व ग्रंथांना चांगली मागणी आहे़ मागील वर्षीपेक्षा यंदा पुस्तक व धार्मिक ग्रंथ खरेदीला चांगला प्रतिसाद आहे़ रमजान महिन्याबरोबरच इतर काळातही मुस्लीम बांधव धार्मिक पुस्तके खरेदी करून वाचन करतात़ -जिशान इसुब शेख, धार्मिक पुस्तक विक्रेते, विजापूर वेस, सोलापूर 

दहा ते पंधरा हजार धार्मिक ग्रंथ, पुस्तकांची होतेय विक्री- रमजान महिन्यात दहा ते पंधरा हजारांहून अधिक धार्मिक ग्रंथांची विक्री होत असते़ शहरातील विविध ठिकाणी असे २० ते २५ धार्मिक ग्रंथ, पुस्तकांची दुकाने आहेत़ या महिन्यात सरासरी दहा ते पंधरा हजार धार्मिक ग्रंथ-पुस्तकांची विक्री होते. हे धार्मिक ग्रंथ विविध भाषेमध्ये प्रकाशित होत असल्याने सर्वधर्मीय बांधव विश्लेषणात्मक कुरआन घेऊन वाचतात, अशी माहिती समीउल्लाह शेख, महंमद इसुब शेख व जिशान शेख यांनी दिली.

रमजान महिन्यात धार्मिक ग्रंथांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते़ शिवाय लग्नात आपल्या मुलीला कुरआन भेट देण्याची परंपरा मुस्लीम समाजात आहे़ त्यामुळे लग्नसराई काळातही कुरआनची विक्री मोठ्या प्रमाणात होते़ रमजान महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्यात धार्मिक ग्रंथांचे वाचन सर्वच स्तरातील बांधव करतात़ यंदा कुरआनच्या किमती २०० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत तर पारा पेटीच्या किंमत ३५० रुपयांपासून १२५० रुपयांपर्यंत आहेत़- मुमताज हुसेन चौधरी, धर्मग्रंथ विक्रेते, विजापूर वेस, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरRamzanरमजानRamzan Eidरमजान ईद