शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

मुंबईचा लोकल पसारा पाहून चिनी अवाक

By admin | Updated: July 17, 2014 02:29 IST

४५ लाख प्रवासी आणि त्यांची लोकलमधून होणारी वाहतूक याची माहिती घेतानाच प्रत्यक्षात उपनगरीय लोकल प्रवाशांची वर्दळ पाहणाऱ्या चीनच्या शिष्टमंडळातील २२ जणांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली

मुंबई : ४५ लाख प्रवासी आणि त्यांची लोकलमधून होणारी वाहतूक याची माहिती घेतानाच प्रत्यक्षात उपनगरीय लोकल प्रवाशांची वर्दळ पाहणाऱ्या चीनच्या शिष्टमंडळातील २२ जणांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली आणि केवढा हा पसारा, असे म्हणत रेल्वे प्रशासनाची पाठही थोपटली. चीनच्या रेल्वे आणि त्यांच्या अन्य विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबई भेटीवर आले असून, त्यांनी बुधवारी मध्य रेल्वेला भेट दिली. चीनचे २२ जणांचे शिष्टमंडळ सध्या १३ ते १७ जुलैपर्यंत भारत दौऱ्यावर आले आहे. हे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईत आले होते. या शिष्टमंडळात नॅशनल रेल्वे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे (एनआरए) उप प्रशासकीय अधिकारी झेंग झियान यांच्यासह चीनच्या वाहतूक विभागातील आणि पीपल रिपब्लिक आॅफ चायनाच्या एनआरएमधील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या वेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम होते. दुपारी १२ वाजेपर्यंत शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर त्यांना वर्ल्ड हेरिटेज असलेले आणि मुंबईतील सर्वात महत्त्वाचे वर्दळीचे असे सीएसटी स्थानक दाखवण्यात आले. या स्थानकाची पाहणी करतानाच त्यांनी लोकलमधून उतरणारा आणि स्थानकात येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांचा लोंढा बघितला. हे पाहताच चिनी शिष्टमंडळातील सदस्य अवाक् झाले. (प्रतिनिधी)