शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

लडकोंपे नजर रखनी पडेगी!

By admin | Updated: December 4, 2014 02:49 IST

हमे भी ये जानना होगा की हमारे बच्चे किसके संगत मे है और वो दिन भर क्या कर रहे है... कल्याणच्या सर्वोदय रेसिडेन्सीमधून बाहेर

मुंबई : हमे भी ये जानना होगा की हमारे बच्चे किसके संगत मे है और वो दिन भर क्या कर रहे है... कल्याणच्या सर्वोदय रेसिडेन्सीमधून बाहेर पडणारा मध्यमवयीन रहिवासी सांगत होता. जिहादी विचारांचा पगडा असलेला आरीफ माजीद याच सोसायटीतला. भारतात परतून अरीबला सहा दिवस झाले. त्याचे गायब होणे, इसीससाठी सीरीयात जाणे आणि परतल्यावर एनआयएने अटक करणे यामुळे निर्माण झालेला तणाव या सोसायटीतल्या वातावरणात जाणवत होता. आरीफसह त्या चार तरुणांचे हे कृत्य आम्हाला पटलेले नाही, अशीच प्रतिक्रिया या सोसायटीसह अन्य मोहल्ल्यातूनही व्यक्त होते आहे.आरीफ सहीसलामत भारतात परतल्याने अमन तांडेल, फहाद शेख आणि साहीम तानकी यांच्या कुटुंबियांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. हे तिघे आरीफप्रमाणे सहीसलामत परतावेत यासाठी कुटुंबियांसह परिचयातील सर्वांनी प्रार्थनाही सुरू केल्या आहेत. हे चारही तरुण राहत असलेल्या सोसायट्या, मोहल्ल्यांमध्ये फेरफटका मारला असता तेथे तणावपूर्ण शांतता आढळली. विशेषत: अनोळखी व्यक्तींकडे नजरांमध्ये संशय दिसला. आरीफच्या घराचे दार त्याच्या आईने उघडले. उसने हसू आणून तिने सलामदुवाही स्वीकारला. मात्र आरीफचे नाव ऐकून त्याच्याबाबतचे प्रश्न ऐकून तिच्या चेहऱ्यावर तरळलेली काळजी स्पष्टपणे दिसली. आरीफके अब्बू घर पे नही है. वो एनआयए के दफ्तर गये है. घरपे सब औरते है. बोलने वाला कोई भी नही... काही ऐकण्याच्या आत तिने सांगून टाकले. त्यातही आरीफबाबत जाणून घेण्याची धडपड लोकमत प्रतिनिधीने केली तेव्हा तीने हमे कुछ कहना नही है, असे सांगून तोंडावर दार बंद केले. त्या त्या मोहल्ला, सोसायट्यांच्या आसपास राहणाऱ्यांना या चौघांची कृती चांगलीच ठाऊक आहे. मात्र अनोळखींसमोर कोणीही बोलायला तयार नव्हता. अरे भाय, हम तो यहा नये है, अशी प्रतिक्रिया देऊन चार ते पाच जणांनी परस्पर टाळले. काहींनी तर चक्क यापैकी कोणालाच ओळखत नाही, असे सांगून टाकले. काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या चारही तरुणांनी खूप आधीपासून सीरियात जाण्याची तयारी केली होती. त्यांची माथी इथल्या लोकांनी भडकावली. त्यांच्या मनाचा ठाव जिहादी विचार घेत होते. मात्र त्यांच्या पालकांना यातले काहीएक ठाऊक नव्हते. जेव्हा समजले तेव्हा ते हादरलेच असावेत. तो धडा सर्वांनीच घ्यायला हवा. मुले शिक्षणाच्या किंवा अन्य कोणत्याही निमित्ताने घराबाहेर असतात तेव्हा ते कोणाच्या संगतीत असतात, त्यांचा मित्रपरिवार कोण हे जाणून घ्यायला हवे. (प्रतिनिधी)