शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

मुख्यमंत्र्यांच्या सचिवाचे ‘बेकायदा’ काम न केल्याने आकसाने बदली ?

By admin | Updated: August 30, 2015 02:18 IST

मनमाड येथील पोलीस परेड ग्राऊंडभोवती कुंपण भिंत बांधून ते बंद न करता शेजारी असलेल्या छत्रे हायस्कूलला त्या मैदानाचा पूर्वीप्रमाणेच वापर करू द्यावा, हे मुख्यमंत्र्यांचे सचिव

मुंबई : मनमाड येथील पोलीस परेड ग्राऊंडभोवती कुंपण भिंत बांधून ते बंद न करता शेजारी असलेल्या छत्रे हायस्कूलला त्या मैदानाचा पूर्वीप्रमाणेच वापर करू द्यावा, हे मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांचे ‘बेकायदा’ सांगणे आपण ऐकले नाही म्हणून दराडे यांनी आकसाने आपली बदली करायला लावली, असा गंभीर आरोप मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र वासुदेव मेघराजानी यांनी केला आहे.गेल्या वर्षी फेब्रुवारीत औरंगाबादहून मनमाडला आलेल्या मेघराजानी यांची २१ आॅगस्ट रोजी वाशिमला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. जुलैमध्ये गडचिरोलीहून रायगड जिल्ह्यात पेण येथे नियुक्ती झालेले पण तेथे रुजू न झालेले डॉ. राहुल धर्मराज खाडे यांना मेघराजानी यांच्या जागी मनमाजला पाठविण्यात आले.मेघराजानी यांनी या बदलीच्याविरोधात महराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका केली आहे. त्यात त्यांनी पोलीस महासंचालक व राज्य सरकारसोबत दराडे यांनाही प्रतिवादी केले आहे. ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. ए.एच. जोशी यांनी शुक्रवारी या याचिकेच्या संदर्भात मेघराजानी यांच्यातर्फे अ‍ॅड. अरविंद व भूषण बांदिवडेकर व सरकारसाठी सरकारी वकील के. बी. भिसे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर प्रतिवादींनी ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र करण्याचे निर्देश दिले. १० सप्टेंबर रोजी याचिकेवर प्राथमिक स्तरावरच अंतिम सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले गेले. न्यायाधिकरणाने मेघराजानी यांच्या बदलीस स्थगिती दिली नाही. ते वाशिमला रुजू होऊ शकतात व त्यांनी तसे केले तरी याचिका मंजूर झाल्यास त्यांना अनुकूल आदेश मिळण्यात अडचण येणार नाही, असे ‘मॅट’ने नमूद केले.बदली आदेश निघाल्यावर लगेच आपण मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांची भेट घेऊन ही बदली कशी अन्याय्य आहे ,हे त्यांना सांगितले. परंतु त्यांनी दखल घेतली नाही, म्हणून आपण याचिका केली, असे मेघराजानी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दराडे यांच्याकडून परेड ग्राऊंडला कुंपण भिंत बांधू नका, ते छत्रे हायस्कूलला वापरू द्या, असा फोन ४ आॅगस्ट रोजी आल्यावर मेघराजानी यांनी त्याची लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस डायरीत रीतसर नोंद केली. एवढेच नव्हे तर त्यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक व नाशिक परिमंडळाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना पत्र लिहूनही या बाबतीत येत असलेल्या राजकीय दबावाची माहिती त्यांना दिली. (विशेष प्रतिनिधी)नेमके केव्हा, काय घडले?मेघराजानी यांनी याचिकेत शपथपूर्वक कथन करून जो घटनाक्रम दिला आहे तो थोडक्यात असा-मनमाडमध्ये १९२३ पासून दोन हेक्टर २१ आर क्षेत्रफळाचे पोलीस परेड ग्राऊंड आहे. तेथे शीघ्र कृती दलाचे कार्यालयही आहे व त्यावर रेस्ट हाऊसही बाधायचा प्रस्ताव आहे.या परेड ग्राऊंडच्या शेजारी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे छत्रे हायस्कूल आहे. हायस्कूल, विद्यार्थी व पालक गेली अनेक वर्षे या ग्राऊंडचा वापर करीत असे.प्रवीण दराडे याच हायस्कूलचे विद्यार्थी आहेत व त्यांचे एक चुलत बंधू मनमाडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत.मेघराजानी यांनी मनमाडमध्ये बदलून आल्यावर २४.३४ लाख रुपये मंजूर करून घेतले व सा.बां. विभागातर्फे परेड ग्राऊंडभोवती कुंपण भिंत बांधण्याचे काम सुरु केले.सामाजिक व राजकीय क्षेत्रातून यास विरोध झाला. याच पार्श्वभूमीवर दराडे यांनी फोेन करून ‘आजवर कोणाही डीवायएसपीची कुंपण बांधण्याची हिंमत झाली नाही’, असे ऐकविले.सा. बा. विभागाच्या अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार नाशिकच्या भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सांगण्यावरून काम थांबविले गेले. पण नंतर ते पुन्हा सुरु झाले.२० फूट बाय ३८२ फूट कुंपण भिंत आपल्या जागेवर बांधली आहे, असा छत्रे हायस्कूलचा दिवाणी न्यायालयात दावा. सरकार व पोलीस विभागाकडून याचा प्रतिवाद.याच विषयावर उच्च न्यायालयात जनहित याचिका.दिवाणी दावा व जनहित याचिका प्रलंबित.