शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री ताटकाळत थांबले

By admin | Updated: July 14, 2016 18:48 IST

साहेब ! बाहेर शेतकरी आलेत. त्यांचे काही प्रश्न आहेत.तुम्हाला भेटायंच म्हणतात़़. त्यांना बोलावू का? असे प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारताच

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर, दि. १४ - साहेब ! बाहेर शेतकरी आलेत. त्यांचे काही प्रश्न आहेत.तुम्हाला भेटायंच म्हणतात़़. त्यांना बोलावू का? असे प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ हो म्हणत, चला भेटूयात म्हणत मुख्यमंत्री धावपट्टीवरून चालत मुख्य कार्यालयापर्यंत आले, पण़ शेतकरी गायब़़ पुन्हा मुख्यमंत्री म्हणाले, कुठे आहेत शेतकरी ? बोलवा त्यांना़ अखेर शेतकरी न आल्याने मुख्यमंत्री १५ ते २० मिनीट ताटकत थांबले !घडलेला प्रकार असा की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरातील आषाढी वारीच्या महापुजेसाठी सहपरिवार गुरुवारी सोलापुरातील विमानतळावर दाखल झाले़ मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडाव्यात म्हणून काही शेतकरी विमानतळावर आले होते़ आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे तसा निरोप तरी द्या अशी हाक शेतकऱ्यांनी प्रांताधिकासमोर मांडली़ यावेळी प्रांताधिकारी पवार यांनी ठीक आहे मी मुख्यमंत्र्यांना निरोप देतो त्यांनी जर वेळ दिला तर भेट होईल अन्यथा नाही असेही प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले़ यानंतर काही वेळाने मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन होताच उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांचा तो निरोप पोहचविला़ या निरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी कशाचाही विचार न करता तत्काळ शेतकऱ्यांना भेटण्यासाठी होकार दिला व पायी चालत ते विमान प्राधिकरण कार्यालयाकडे निघाले़ यावेळी शेतकऱ्यांना लवकर बोलवा़ मुख्यमंत्री पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हटले़. यानंतर काही वेळाने प्रभारी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी साहेब ! शेतकरी बाहेर नाहीत, असा निरोप दिला़ त्यानंतर मुख्यमंत्री निराश होऊन परतले़ यावेळी प्रभारी पोलीस आयुक्त दिपक पांडे, सहा़ पोलीस उपायुक्त अर्पणा गिते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रांताधिकारी शहाजी पवार, तहसिलदार समाधान शेंडगे, मनपा उपायुक्त अजित साठे आदी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ प्रांतधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती दिली़ खरेच शेतकरी आले होते गेले कुठे़़़जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाअभावी मुख्यमंत्री फडणवीस यांना ताटकाळत उभे रहावे लागले़ ही गोष्ट चुकीची आहे़-शहाजी पवारभाजपा जिल्हाध्यक्ष, सोलापूऱशेतकऱ्यांचे प्रश्न व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टी सोडून काही अंतर चालत आले होते़ प्रचंड पोलीस बंदोबस्त व वेळ कमी असतानाही शेतकऱ्यांना भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनाच्या समन्वयाचा अभावामुळे परत निघून जावे लागले़-अशोक निंबर्गीभाजपा, शहराध्यक्ष, सोलापूर शहऱकाही नाही शेतकरी विविध विषयांवर बोलणार होते़ ते येथे आलेही होते़ त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा निरोप दिला होता़ पण शेतकरी गायब कधी झाले हे कळलेच नाही़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व शेतकऱ्यांची भेट होऊ शकली नाही़-शहाजी पवारप्रांताधिकारी, सोलापूऱसंतप्त शेतकरी निघून गेले.सोलापूर दुष्काळी जिल्हा़ तीन नक्षत्रे कोरडी गेली़ खरीप हंगामही वाया गेला़ फळबागा जळून गेल्या, अशा स्थिती आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन मांडू शकत नाही, तेच सोलापुरात येणार ही माहिती मिळताच शेतकरी त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर आले होते़ मात्र पोलिसांनी बंदोबस्ताचे कारण पुढे करीत अक्षरश: त्ऱ्यांना तेथून पिटाळून लावले़ शेतकरी संतापाने निघून गेले़.