शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेली , अनिता सावळे यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 04:47 IST

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार मी मागे घेतलेली नाही. दंगलीतील गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे तक्रारदार अनिता सावळे यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात माहिती देताना संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याचे सांगितले होते. याबाबत सावळे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेषत: सरकारने देखील गुन्हे दाखल केलेले आहेत. भिडे यांना २५ मार्चपर्यंत अटक करावे, अन्यथा २६ मार्चला मुंबईत एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाने सरकारला दिला होता. त्यानुसार हे आंदोलन झाले. मात्र, त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी भिडेंना क्लीन चीट दिली. भिडे यांच्या विरोधात पुरावा नाही आणि तक्रार दाखल केलेल्या महिलेने तक्रार मागे घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. दरम्यान, मी तक्रार मागे घेतली नसून संभाजी भिडे यांना दगड मारताना पाहिले, असे मी म्हटलेले नाही. दंगलीच्या ठिकाणी दंगेखोर हे संभाजी भिडे यांचे नाव घेत असल्याचे आम्ही ऐकले आहे, असे अनिता सावळे यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.मुख्यमंत्री अशाप्रकारची दिशाभूल कशासाठी करीत आहेत, असा सवाल सत्यशोधन समितीचे डॉ. भारत पाटणकर व ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. प्रतिमा परदेशी यांनी विचारला आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव