शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी विरोध करणे चूकीचे; चर्चेतून मार्ग काढू - चंद्रकांत दादा पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 20:32 IST

मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच  र्वरीत  मागण्यांसाठी ही प्रयत्नही सुरू आहेत.

मुंबई - मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच  र्वरीत  मागण्यांसाठी ही प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सारेजण प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. यासाठी विरोध न करता चर्चेतूनच मार्ग काढावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

महसूल मंत्री  चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चे काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. सगळ्या जगाला आदर्श होईल, अशा पद्धतीने हे मोर्चे काढून त्यांनी सरकारसमोर मागण्या ठेवल्या. या मागण्यांचा विचार करत सरकारने वेळोवेळी निर्णय घेत या मागण्या मान्य केल्या. शिष्यवृत्ती मधील सवलत, वसतिगृहांमधील सवलत, नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षणात आरक्षण यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. न्यायालयात ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार भक्कमपणे बाजू मांडत आहे. मराठा समाजाच्या प्रत्येक मागण्या पुर्ण करण्यात आले आहेत. न्यायालयातील बाबीदेखील सरकारची बाजू कशी बरोबर आहे, हे सांगण्याचे काम केले जात आहे. 

क्रांती मोर्चा नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागण्या पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे व प्रमुख मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पूर्ण ही करण्यात आल्या आहेत. नुकतीच विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोकर भरती देखील मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले. यावरूनच मुख्यमंत्र्यांचं सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे.  मराठा समाजाच्या मागणीसाठी उपसमितीची देखील नेमणूक करण्यात आली असून स्वतः मी अध्यक्ष या नात्याने याची कामकाज अत्यंत जलदगतीने व वेगाने होण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद केली आहे तसेच आण्णासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास योजना देखील मराठा समाजातील तरुण तरुणींसाठी लागू केली आहे.

मागण्या पूर्ण होत असताना पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. आपल्या अजूनही काही मागण्या असल्यास त्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे व त्या मागण्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करील. त्यामुळे विरोध करण्यापेक्षा चर्चा करून मार्ग निघू शकतो.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील