शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

प्रशिक्षणार्थिंसोबत मुख्यमंत्री साधणार संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 8:25 PM

राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थिंसोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान वेब बेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थिंसोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान वेब बेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या उपक्रमात राज्यातील ५६ शासकिय आयटीआयची निवड केली असून खासगी आयटीआयला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या खासगी आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी आयटीआय आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रवेश प्रक्रियेत ८६ हजार २६४ प्रशिक्षणार्थिंनी शासकीय आणि ३० हजार ७८४ प्रशिक्षणार्थिंनी खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेतले. याठिकाणी प्रशिक्षणार्थिंना विविध ७८ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ह्यस्कील इंडियाह्ण या योजनेबाबत संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळायला हवी. मात्र प्रशासनाने दुजाभाव करत खासगी आयटीआयला पुन्हा एकदा सावत्र वागणूक दिल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केला आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिगसाठी आवश्यक सुविधा असल्यानेच पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय आयटीआयची निवड केल्याचा खुलासा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केला आहे. सदर उपक्रम वर्षभर चालणार असून भविष्यात खासगीआयटीआय निवडीचा विचार नक्कीच केला जाईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले. तूर्तास तरी शासनाच्या विभागस्तरावर हा निर्णय झाला असल्याने कोणीही रागवण्याचे कारण नाही, असे आवाहन संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेकेले आहे.